थंडीतील उबदार भेटवस्तू: प्रसूत माता व बालकांना दिलासा
आर्य वैश्य महिला आघाडीचा सामाजिक उपक्रम : ग्रामीण रुग्णालयात वितरण
बहुगुणी डेस्क, वणी: आर्य वैश्य महिला आघाडी व वाम (वर्ल्ड आर्यवैश्य महासभा) यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी दिनांक 9-12-25 रोजी ग्रामीण रुग्णालय वणी येथे सामाजिक बांधिलकीतून एक उपक्रम राबविण्यात आला. हिवाळ्याच्या थंडीचे औचित्य साधून 10 प्रसूत महिलांना मेवालाडु व लोकरीची टोपी तर नवजात शिशूंना स्वेटर, टोपी व मोजे यांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे मातांना मानसिक आधार मिळाला तर नवजात शिशूंना थंडीपासून संरक्षण मिळाले. मंडळाच्या अध्यक्षा किर्ती किशोर कोंडावार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकार झाला. त्यांनी सांगितले की, समाजातील दुर्बल घटकांना आधार देणे हीच खरी सेवा असून अशा उपक्रमांमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढतो.
या कार्यक्रमाला मंडळाच्या अर्चना गंजीवार, जयश्री गोरंटीवार, मेघा गोरंटीवार, शुभांगी सुरावार, सरलाताई नार्लावार, अमिता गंजीवार, भारती कोलप्याकवार, अश्विनी ऊत्तरवार, विशाखा ऊत्तरवार, कविता जन्नावार यांनी सक्रिय सहभाग घेतला. उपस्थित महिलांनी एकत्रितपणे प्रसूत माता व बालकांना भेटवस्तू देत त्यांना शुभेच्छा दिल्या. या उपक्रमामुळे ग्रामीण रुग्णालयातील वातावरण आनंदमय झाले. मातांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले तर नवजात शिशूंना मिळालेल्या उबदार भेटींनी उपस्थितांच्या मनातही समाधानाची भावना निर्माण झाली.



Comments are closed.