सामाजिक कार्यकर्ते विजयबाबू चोरडिया यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जितेंद्र कोठारी, वणी: आज संध्याकाळी 6 वाजता शहरातील पाण्याच्या टाकीजवळील शासकीय मैदानात सुप्रसिद्ध भजन गायिका शहनाज अख्तर यांच्या भजन संध्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते व सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त जय श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव समितीच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. 

शहनाज अख्तर यांची भजन संध्या
रविवारी दिनांक 4 सप्टेंबर रोजी वणीतील शासकीय मैदान येथे सुप्रसिद्ध भजन गायिका शहनाज अख्तर यांच्या भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शहनाज ही मध्यप्रदेश येथील रहिवासी असून भजन गाणारी मुस्लिम गायिका म्हणून ती देशभरात प्रसिद्ध आहे. ‘मुझे चढ गया भगवा रंग’ हे तिचं गाणं चांगलंच प्रसिद्ध झालं आहे. वयाच्या 10 व्या वर्षापासून ती भजन गात आहे.

कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावा – कुणाल चोरडिया
दरवर्षी प्रमाणे या वर्षीही सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मारेगाव, कायर आणि वणी येथील नेत्र चिकित्सा व मोतीबिंद शस्त्रक्रिया शिबिराला रुग्णांनी भरभरून प्रतिसाद दिला. आज होणा-या भजन संध्येलाही वणीकरांकडून उत्स्फुर्त प्रतिसादाची अपेक्षा आहे. 
– कुणाल चोरडिया, श्रीकृष्ण जन्माष्टमी समिती, वणी

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जय श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव समिती, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, आदर्श महिला बहुउद्देशीय संस्था मारेगाव हे परिश्रम घेत आहे. भजन संध्येला कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Comments are closed.