रिसेप्शनमध्ये नाचण्याच्या कारणावरून तरुणास जबर मारहाण

तरुण जबर जखमी, उपचारासाठी वर्धा येथे भरती

विवेक तोटेवार, वणी: मित्राच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये नाचण्यातून झालेल्या वादातून एका तरुणाला तीन तरुणांनी जबर मारहाण केली. त्या मारहाणीत त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. जखमीला सध्या वर्धा येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. सदर घटना ही 25 एप्रिल रोजी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास घडली.

फिर्यादी राहुल महादेव तोताडे यांच्या भाऊ अतुल तोताडे (28) हे वाघदरा येथे राहतात. 25 एप्रिल रोजी गावातील एकाकडे लग्नाचे रिसेप्शन असल्याने अतुल त्या ठिकाणी रात्री 10 वाजताच्या सुमारास कार्यक्रमात गेला होता. त्यावेळी तिथे नाचगाणे सुरू होते. नाचण्याच्या कारणावरून आरोपी दिनेश कुडमेथे (20), रवी टेकाम (26) व रामदास टेकाम (24) यसनी अतुलला मारहाण केली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दिनेश याने अतुलच्या डोक्यावर दगडाने वार केला यामध्ये अतुलच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. त्याला आधी एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र जखम गंभीर असल्याने दुस-या दिवशी त्याला वर्धा येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अतुल चा भाऊ राहुल याच्या तक्रारीवरून तिन्ही आरोपीं विरुद्ध कलम 324, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास प्रकाश गोर्लेवार करीत आहे.

हे देखील वाचा:

Comments are closed.