‘वणी बहुगुणी’ इम्पॅक्ट… अखेर नवेगाव शाळेचा अहवाल शिक्षणाधिका-यांकडे सादर

दोन गुरू, एक चेला बातमीची प्रशासनाकडून दखल

0

वणी: वणी तालुक्यातील शिरपूर केंद्राअंतर्गत येणा-या नवेगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये एका विद्यार्थ्यासाठी दोन शिक्षक नेमण्यात आले होते. या संदर्भात ‘दोन गुरू एक चेला’ ही बातमी वणी बहुगुणीनं दिली होती. अखेर वणी बहुगुणीचा इम्पॅक्ट दिसला आणि याची दखल वणी पंचायत समिती शिक्षण  विभागाला घ्यावी लागली. यासंदर्भात शिक्षण विभागानं अहवाल तयार करून शिक्षणाधिकारी यवतमाळ यांचेकडे पाठविला आहे. आता एकाच विद्यार्थ्यासाठी दोन शिक्षक ठेवतात की त्यांचे समायोजन करतात याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

वणी तालुक्यातील शिरपूर केंद्रात येणारी नवेगाव येथील जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेत एकूण ५ वर्ग आहेत. मात्र या १ ते ५ वर्गात फक्त एकच विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या विद्यार्थ्याला शिकवायला मात्र पंचायत समिती वणीच्या शिक्षण विभागाने दोन शिक्षकांची नियुक्ती केली आहे. सदर विद्यार्थी एकटाच असल्याने त्याने शाळा सोडून जाण्याची विनंती केली होती, मात्र मुख्याध्यापकाचा पुतण्या असल्याने त्याला शाळा सोडण्याचा दाखला दिला नसल्याचे बोललं जात होतं.

यासंबंधी वणी बहुगुणी डॉट कॉमनं बातमी पब्लिश केली होती. वणी पंचायत समिती शिक्षण विभागानं याची तात्काळ दखल घेत नवेगाव शाळा गाठली. प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे व केंद्रप्रमुख प्रकाश नागतुरे यांनी शाळेला भेट देवून तपासणी केली. संबधीत शाळेत त्यांना एकच विद्यार्थी आढळला.  त्यानंतर त्यांनी यासंबधीचा अहवाल शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांचेकडे पाठविला असल्याची माहिती आहे.

नवेगाव शाळेतील शिक्षकाला आदेश देण्यात आला असून जर संबंधीत शाळेत विद्यार्थी नसेल, त्यादिवशी त्यांनी केंद्र शाळा भालर येथे जावून ज्या शाळेत शिक्षक नसेल त्या शाळेवर शिकवावं असा आदेश दिला असल्याचीही माहिती मिळत आहे.

(बीईओने मिळवून दिली कुटुंबातील शिक्षिकेला लगतची शाळा

वणी बहुगुणीनं पाठपुरावा करीत वास्तव उघड पाडून संबधीत शाळेत ‘दोन गुरू एक चेला’ असल्याची बातमी पब्लिश करताच प्रशासनानं तात्काळ दखल घेतली आहे. सोबतच मारेगाव पचायत समिती शिक्षण विभागाची चौकशी सुध्दा होणार असल्याची माहीती आहे. मारेगाव येथिल प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांनी पदाचा दुरूपयोग करीत चक्क कुटुंबातील महिला शिक्षिकेला तालुक्यालगत असलेली शाळा देऊन समायोजन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आता या प्रकरणी काय कार्यवाही होते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.