पांदण रस्त्यावरून दोन कुटुंब आपसात भिडले, एकमेकांवर विळा, काठीने हल्ला

विवेक तोटेवार, वणी: पांदण रस्त्यावरून दोन कुटुंबात वाद झाला. वादाचे पर्यावसन एकमेकांवर हल्ला करण्यात झाले. या प्रकरणी दोन्ही कुटुंबातील व्यक्तींनी एकमेकांवर विळा व काठीने हल्ला केला. यात दोन्ही कुटुंबातील व्यक्ती जखमी झाले आहे. सदर घटना आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास भालर शेतशिवारात घडली. दोन्ही कुटुंबातील सदस्यांच्या तक्रारीवरून 6 जणांवर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहिल्या तक्रारीनुसार, फिर्यादी अनिता अरुण भगाडे व त्यांचे पती अरुण भगाडे यांची भालर शेतशिवारात 8 एकर शेती आहे. त्यांच्या शेतीच्या बाजूने पांदण रस्ता आहे. या पांदण रस्त्यावरून अनेक शेतकरी ये-जा करतात. लगतच आरोपी दिनेश बदखल यांचीही शेती आहे. बदखल हे शेतात जाण्यासाठी याच पांदण रस्त्याचा वापर करतात. परंतु बदखल कुटुंबीयांनी शेतातूनच वाट काढली. त्यामुळे भगाडे यांच्या शेतीचे नुकसान होत आहे असा भगाडे कुटुंबीयांचा आरोप आहे. 

रविवार सकाळी 11 वाजताच्या सुमारास भगाडे पती पत्नी हे त्यांच्या शेतात काम करीत होते. दरम्यान आरोपी अनिता बदखल व तिचे पती दिनेश बदखल त्यांनी भगाडे कुटुंबातील सदस्यांना टोकले. यावरून भगाडे पती-पत्नीचा आरोपी दिनेश सोबत वाद झाला. दरम्यान आरोपी दिनेश याने अनिता यांच्या डोक्यावर विळ्याने वार करून जखमी केले. पती अनिल हा वाद सोडविण्यासाठी गेला असता त्याला देखील मारहाण करण्यात आली. फिर्यादी अनिता हिच्या तक्रारीवरून आरोपी दिनेश बदखल (50), लता दिनेश बदखल (45) व अंकित दिनेश बदकल (25) यांच्यावर कलम 324, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपस हे कॉ गजानन होडगिर करीत आहे.

बदखल कुटुंबियांच्या तक्रारीनुसार, फिर्यादी दिनेश बदखल हे शेतात काम करीत होते. त्यांची पत्नी लता ही सकाळी 11 वाजताच्या सुमारास टिफिन घेऊन येत होती. दरम्यान पांदण रस्त्याने येताना आरोपी अनिता भगाडे हिने दिनेशची पत्नी लता सोबत वाद घातला. वाद झाल्याने आरोपी अरुण भगाडे हा विळा घेऊन आला. त्याने लताच्या डोक्यावर व हातावर विळ्याने वार केला. यात लता जखमी झाली. दरम्यान भगाडे यांचा मुलगा राहुल हा देखील मध्ये पडला. त्याने काठीने लता व दिनेश यांना मारहाण केली. दिनेश यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसात आरोपी अरुण हिरामण भगाडे, अनिता अरुण भगाडे व राहुल अरुण भगाडे, तिघेही रा. भालर यांच्यावर कलम 324, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा तपास हेकॉ दिगंबर किनाके करीत आहे.

हे देखील वाचा: 

लोकांना दिसतये मात्र अधिकारी आणि लोक प्रतिनिधींच्या डोळ्यावर पट्टी !

फक्त 499 रुपयांमध्ये कोणतेही 2 ब्रँडेड कपडे, इंटरनॅशनल बँडवर 50 टक्के सूट

आरोपीला मोबाईल देणे पडले पोलिसाला महागात, हवालदार निलंबित

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.