विलास ताजने, वणी: मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातून विदर्भातील चंद्रपूर येथे विक्रीसाठी टरबूज वाहून नेणाऱ्या ट्रकला पुरड ते पुनवट दरम्यान दि. 20 बुधवारला सकाळी 10 वाजताच्या दरम्यान अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही प्राणहानी झाली नाही. मात्र संबंधित शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार नांदेड येथील शेतकरी टरबूज विक्री साठी ट्रक क्रमांक (एम. एच. 26 एडी 1892) नी वणी मार्गे चंद्रपूर येथे जात होते. पूरड ते पुनवट रस्त्यावरील प्रवासादरम्यान ट्रकचा टायर फुटल्यामुळे ट्रक अनियंत्रित होऊन रस्त्याच्या दुभाजकावर पडला. यावेळी ट्रक मधील टरबूज रस्त्यावर विखुरले. परंतु सुदैवाने या अपघातात कोणतीही प्राणहानी झाली नाही. मात्र संबंधित शेतकऱ्यांचे अंदाजे 75 ते 80 हजारांचे नुकसान झाले आहेत.
टाळेबंदीमुळे बंद असलेली फळांची विक्री सुरू झाली. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील बागायतदार शेतकरी टरबूज, काकडी आदी मालाची विक्री करण्यासाठी वणी, चंद्रपूर येथे नेहमी ट्रकद्वारे ये जा करतात. मात्र अचानक घडलेल्या या अपघातामुळे आधीच अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Next Post