मुलाला फोन करून वडिलांनी घेतला गळफास

मुलगा घटनास्थळी पोहोचत पर्यंत झाला होता उशिर....

जितेंद्र कोठारी, वणी: वेकोलि ((WCL) मध्ये कामावर असलेल्या एका कर्मचाऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटना मंगळवार 19 जुलै रोजी सकाळी 9.30 वाजता भालर रोड एमआयडीसी परिसरात हनुमान मंदिराजवळ उघडकीस आली. सुनील बापूजी नरुले (46) रा. पटवारी कॉलोनी वणी असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

Podar School 2025

फिर्यादी विशाल अशोकराव धोटे (30) रा. भालर वसाहत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे सासरे सुनील बापूजी नरुले हे वेकोलिच्या जुनाड कोळसा खाणीत नोकरीवर होते. आज मंगळवार सकाळी 6 वाजता ड्युटीवर जातो असे सांगून ते मोटरसायकलने घरुन निघाले होते. सकाळी 9 वाजता दरम्यान सुनील नरुले यांनी मुलगा स्वप्नील याला हनुमान मंदिराजवळ आत्महत्या करीत आहो असे फोनवर सांगितले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

वडिलांच्या फोनमुळे घाबरलेल्या स्वप्नीलने लगेच भालर येथील जावई विशाल धोटे याना फोनवर कळविले. तसेच भालर मार्गावरील हनुमान मंदिराजवळ जाऊन पाहिले असता त्याचे वडील एका टेम्बराच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेतलेले आढळले.

स्वप्नीलने तातडीने याची माहिती नातेवाईकांना दिली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळ गाठून मृतदेहाला झाडावरून खाली उतरवले व पंचनामा केला. मृतक सुनील नरुले यांनी आत्महत्या का केली याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झाले नाही. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा: 

Comments are closed.