वर्चस्वाच्या वादातून WCL कामगार नेत्याची निर्घृण हत्या
वणी तालुक्यातील कुंभारखणी वसाहतीत घडला थरार
जितेंद्र कोठारी (विशेष प्रतिनिधी) वणी: वणी तालुक्यातील कुंभारखणी कोलमाईन्स वसाहतीत शनिवारी रात्री 9.30 वाजता दरम्यान एका कामगार नेत्याची धारदार शस्त्रांने निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी वणी पोलिसांनी 3 मारेकऱ्यांना अटक केली आहे. कोलमाईन्समध्ये वर्चस्वाच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचा कयास सध्या लावल्या जात आहे.
प्राप्त माहितीनुसार अशोक देठे (46) हे मूळते भद्रावती येथील रहिवासी असून वेस्टर्न कोलफिल्डच्या कुंभारखणी कोलमाईन्स मध्ये कार्यरत आहे. ते आपल्या कुटुंबासह कुंभारखणी वसाहतीत राहतात. ते हिंद मजदूर सभा कामगार संघटने कार्यकर्ते होते. शनिवारी रात्री हनुमान जयंती कार्यक्रमात जेवणाच्या वेळी त्यांचा काही लोकांसोबत वाद झाला. जेवण करून परिवारातील लोकांना घरी सोडून अशोक देठे आरोपी उमेश रायच्या घरी गेला. तिथे त्यांचा वाद झाला. हा वाद पुढे विकोपाला गेला. उमेह राय, त्याच्या भाऊ लक्ष्मीकांत राय व त्याचा मित्र सागर यांनी अशोक देठेच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. यात अशोक देठे जागीच कोसळले.
अशोक देठेवर हल्ला करून मारेक-यांनी तिथून पळ काढला. घटने बाबत वणी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटना स्थळ गाठून मृतदेहाचा पंचनामा करून शव विच्छेदना साठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. आरोपी विरुद्ध पोलिसांनी भादंवि कलम 302 अन्वव्ये गुन्हा दाखल करून वरील तिन्ही आरोपीने अटक केली आहे, तर मृतक अशोक देठेच्या पत्नीची घटने नंतर तब्येत बिघडल्यामुळे तिला लोढा हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे कोळसा खदानी मध्ये गँगवार सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे..
लिंकवर क्लिक करून पाहा हा एक्सक्ल्युझिव व्हिडीओ…