महाविद्यालयात शिकणा-या तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

वणी तालुक्यातील नवेगाव (विरकुंड) येथील घटना

0

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील नवेगाव (विरकुंड) येथे एका 18 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. ममता दिनेश काकडे (18) असे आत्महत्या करणा-या तरुणीचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही.

सविस्तर वृत्त असे की ममता ही नवेगाव (विरकुंड) येथे आपल्या आईसह तिच्या मामाकडे राहत होती. ती वणीतील एका कॉलेजमध्ये शिकत होती. शुक्रवारी दिनांक 16 जुलै रोजी तिने घरात कोणी नसताना घराच्या छतातील लाकडी फाट्याला दोर बांधून गळफास घेतला. सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास घरच्या लोकांना ममता गळफास लावलेल्या अवस्थेत दिसताच त्यांनी आरडाओरडा करून तिला खाली उतरविले. याबाबत आत्महत्या केलेल्या तरुणीचे मामा माणिक झाडे रा. विरकुंड यांनी वणी पोलीस स्टेशनला तात्काळ सूचना दिली.

घटना उघडकीस येताच मुलीचे मामा माणिक झाडे यांनी याबाबत वणी पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा केला व मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. आज पोस्टमॉर्टम झाल्यावर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. तरुणीने आत्महत्या सारखे टोकाचे पाउल का उचलले ? याबाबत कळू शकले नाही. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा:

लहानग्या मुलाला उचलून जमिनीवर आदळले

शिबल्याजवळ आढळलेल्या दुर्मिळ दगडी खांबाची जिल्हाधिका-यांकडून दखल

Leave A Reply

Your email address will not be published.