लहानग्या मुलाला उचलून जमिनीवर आदळले

मुलगा जखमी, आरोपीवर गुन्हा दाखल

0

भास्कर राऊत, मारेगाव: छोट्या मुलांच्या वादात मध्ये पडून एका इसमाने लहानग्याला उचलून जमिनीवर आदळले. यात मुलाच्या डोक्याला जबर मार लागून तो जखमी झाला आहे. तालुक्यातील बोरी (खु) येथे ही घटना गुरूवारी दुपारच्या सुमारास घडली.

सविस्तर वृत्त असे की सुवर्णा रमेश मडावी या बोरी (खु) येथील रहिवाशी आहे. त्या त्यांचे पती व मुलासह गावातच राहतात. गुरुवारी दिनांक 15 जुलै रोजी त्या सकाळी शेतीच्या कामासाठी शेतात गेल्या होत्या. दुपारी 12 वाजताच्या सुमारास त्या घरी आल्या असता त्यांचा मुलगा रडत त्यांच्याकडे आला. त्याच्या डोक्याला जबर मार लागला होता व डोक्यातून रक्त येत होते.

याबाबत विचारणा केली असता मुलांचा खेळताना वाद झाला होता. गावातच आरोपी प्रदीप बापुजी गेडाम (35) राहतो. त्याला मुलांचा वाद दिसला. तो घटनास्थळी गेला व या वादात पडला. त्याने सुवर्णा यांच्या मुलाला शिविगाळ करत त्याला उचलून जमिनीवर आदळले. त्यामुळे मुलाच्या डोक्याला गंभीर ईजा झाली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

झालेली घटना ऐकून सुवर्णा यांनी मारेगाव पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी प्रदीप बापुजी गेडाम विरोधात भादंविच्या कलम 324, 504 नुसार गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा:

शिबल्याजवळ आढळलेल्या दुर्मिळ दगडी खांबाची जिल्हाधिका-यांकडून दखल

एका कारवाईतून मिळाले दुस-या कारवाईचे धागेदारे, उघड झाली मोठी तस्करी

Leave A Reply

Your email address will not be published.