खडकी ते अडेगाव रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात
उपोषणाचा इशारा देताच प्रशासनाला खडबडून जाग
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठं गाव असलेले अडेगावकडे जाणाऱ्या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने पाणी साचले होते. त्यामुळे अपघाताची भीती होती. रस्त्याच्या खराब झालेल्या अवस्थेमुळे अडेगाव वासियात प्रचंड संताप उफाळला होता. याबाबत सामाजिक कार्यकर्ते मंगेश पाचभाई यांनी त्वरीत रस्ता दुरुस्त करावा अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा दिला होता अखेर प्रशासनाला जाग आली व रस्त्याच्या कामाला सुरवात झाली आहे.
मंगेश पाचभाई यांनी मारेगाव उपविभागीय बांधकाम अभियंता याना 15 जून रोजी लेखी निवेदन देत रस्त्याची त्वरित दुरुस्ती मागणी केली. रस्ता त्वरित दुरुस्त न झाल्यास बांधकाम कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला होता. मंगेश पाचभाई यांच्या उपोषणाचा इशारा देताच बांधकाम विभाग खबळून जागा झाला वखड्डे पडलेल्या रस्त्यावर मुरूम टाकून खड्डे बुजविण्याचं काम सुरू झाले आहे.
अडेगाव शिवारात चार डोलामाईड खदानी आहेत खदान मधील दगड व रेती मुरमाची ओवरलोड वाहतुम सुरु असल्याने अडेगाव -खडकी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे.
खडकी ते अडेगाव मार्ग पूर्ण खड्डेमय झाला आहे. अनेक छोटे पूल तुटलेल्या अवस्थेत आहे याकडे शासकीय बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
या मार्गावरील अडेगाव, खातेर, येडद, आमलोन, तेजापूर, गाडेगाव गावातील शेकडो नागरिकांना खड्डेमय रस्त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे तर अनेक लहान मोठे अपघात होत आहे. याच मार्गावरील खातेरा नदीवर दोन राज्यांना जोडणाऱ्या पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. भविष्यात याच मार्गावरून चंद्रपूर व तेलंगणात मोठया प्रमाणात वाहतूक सुरू होणार आहे.
रस्ता दुरुस्तीचे काम सुरू होताच जनतेत समाधान व्यक्त केल्या जात आहे. सामाजिक कार्यकर्ते मंगेश पाचभाई गणेश पेटकर, राहुल ठाकूर, विजय लालसरे आदींनी जनतेच्या हितकरिता नेहमी धावपळ करीत अनेक समस्यांचे निराकरण करण्यात भाग पाडले त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हे देखील वाचा: