येदलापूर येथील पावणे १२ लाखांच्या वॉलकंपाउंडची चौकशी कधी होणार

वॉलकंपाउंडच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

0

सुशील ओझा,झरी: तालुक्यातील येदलापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या वॉलकंपाउंडच्या जुडाई व छपाईच्या कामात रेती ऐवजी काली चुरीचा वापर करून निकृष्ट दर्जाचे काम केल्याने संपूर्ण कंपाऊंडच्या भिंतीवर १५ दिवसातच मोठमोठे तडे पडले आहे. त्यामुळे सदर बांधकाम किती दर्जेदार केल्याचे दिसून पडले आहे व त्यांचे पितळ उघडे झाले आहे. वॉलकंपाउंड कामाबाबतची तक्रार वरीष्ठ अधिकाऱ्याकडे करण्यात आली आहे.

वॉलकंपाउंड बांधकाम करताना संंबंधित अभियंत्याने पाहणी किंवा तपासणी केली की नाही, असाही संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे. जिल्हा परिषद शाळेच्या वॉलकंपाउंडच्या कामात मोठा गैरप्रकार झाला असून सदर कामाची योग्य पडताळणी केल्याशिवाय कोणतीही देयके काढण्यात येऊ नये, तसेच शासनाच्या निधीचा चुराडा करून स्वतःचे पोट भरणारे व ठेकेदाराला सहकार्य करणाऱ्या अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवसेनेचे दयाकर गेडाम यांनी बांधकाम विभाग, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, सीईओ व इतर ठिकाणी केली आहे.

खनिज विकास निधी अंतर्गत ग्रामपंचायतीमार्फत जिल्हा परिषद शाळेच्या वॉलकंपाउंडचे काम करण्यात आले. संपूर्ण बांधकामात रेतीचा वापर न करता काळ्या चुरीचा वापर करून निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले आहे. वॉलकंपाउंडचे संपूर्ण काम झाले.

परंतु चारही दिशांनी बांधलेल्या वॉलकंपाउंडच्या भिंतीवर मोठमोठ्या भेगा १५ दिवसांतच पडल्यात. त्यामुळे शासनाच्या निधीचा चुराडा होत असल्याचे म्हणणे आहे. बांधकाम निकृष्ट दर्जाचे व त्यावर पाणीसुद्धा मारण्यात आले नाही, त्यामुळे वॉलकंपाउंड कधी पडणार हेसुद्धा सांगता येणार नसल्याची ओरड गावकरी करीत आहे. शासनाच्या ११ लाख ७६ हजाराचा निधी वाया जात आहे.

२० दिवसांच्या वर लोटूनही अजूनपर्यंत साधी चौकशीसुद्धा झाली नसल्याने पाणी कुठे मुरत आहे, हे समजायला मार्ग नाही. तक्रार करूनही अजून पर्यंत चोकशी का झाली नाही असा प्रश्न संतप्त ग्रामवासी करीत आहे. वॉलकंपाउंडला भेगा पडल्याची बातमी प्रकाशित होताच, सदर ठेकेदाराने काही माणसं लावून भेगा पडलेल्या ठिकाणी घट्ट असा प्लास्टिक पेंट लावून भेगा बुजवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.

या प्रकाराबाबतही तक्रार करण्यात आली आहे. परंतु अजूनपर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. तरी दोषी ठेकेदार व अभियंता यांची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी दयाकर गेडाम यांनी केली आहे.

येदलापूर येथील कामावर याच ठेकेदाराने अवैधरीत्या विना रॉयल्टी ६ ब्रास रेतीचा साठा केल्या प्रकरणी ९२ हजाराचा दंड तहसीलदार गिरीश जोशी यांनी केला होता हे विशेष. तालुक्यात राजकीय ठेकेदारांची संख्या मोठ्या प्रमाणात असून त्यांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

तरी तालुक्यातील सर्व ठेकेदारांच्या सुरू असलेले वॉलकंपाउंड व गावांतर्गत रोड इतर कामांची पाहणी अधिकाऱ्यांनी करून खराब काम करणाऱ्या ठेकेदारावर कठोर कार्यवाहीचीसुद्धा मागणी तक्रारीतून करण्यात आली आहे.

हेदेखील वाचा

तालुक्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत अचानक वाढ

 

हेदेखील वाचा

 ओबीसी विशाल मोर्चाची मारेगाव कृती समिती गठित 

 

Leave A Reply

Your email address will not be published.