सर्जन डॉ. आर. डी. सोनकांबळे यांचे निधन

नागपूर येथे झालेत अंत्यसंस्कार

0

बहुगुणी डेस्क, वणी: येथील चंद्रपूर जिल्ह्याचे सेवानिवृत्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. डी. सोनकांबळे यांचे नागपूर येथे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७५ वर्ष होते. त्यांच्यावर नागपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचे योगदान मोठे होते. दीर्घकाळ त्यांनी रुग्णसेवा केली. वणी येथे गौतम हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांना रुग्णसेवा केली. अल्पावधीतच त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात ख्याती प्राप्त केली.

वांजरवाडा जळकोट येथील भूमिपुत्र असलेले डॉ. आर. डी. सोनकांबळे यांनी मोठ्या कष्टाने मुलांना उच्च विद्याविभूषित केले. मुलगा व सून डॉक्टर तसेच मुलगी डॉक्टर व जावई इंजिनिअर असून ते लंडनमध्ये वास्तव्यास आहेत. डॉ. सोनकांबळे हे बौद्ध तत्त्वज्ञानाचे अभ्यासक होते. उच्चविद्याविभूषित कुटुंब असलेल्या डॉ. आर. डी. सोनकांबळे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा तीन मुली व मोठा गोतावळा आहे.

महाउपासक एस. पी. गायकवाड, प्रभात नगर हाऊसिंग सोसायटीचे माजी चेअरमन माधवराव धुतमल, मेडिकल ऑफिसर डॉ श्रीहरी कांबळे यांचे ते बालमित्र होते. डॉ सोनकांबळे यांच्या निधनानंतर नांदेड, चंद्रपूर व वणीतील त्यांच्या मित्रपरिवारांनी शोक व्यक्त केला.

हेदेखील वाचा

येदलापूर येथील पावणे १२ लाखांच्या वॉलकंपाउंडची चौकशी कधी होणार

हेदेखील वाचा

पालकमंत्री शेतशिवार योजनेंतर्गत पांदणरस्त्यांची कामे त्वरित करा

Leave A Reply

Your email address will not be published.