जितेंद्र कोठारी, वणी: लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या तरूणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. विलास पोतु कुमरे (26) रा. शिरगिरी (पोड), ता. वणी असे आरोपीचे नाव आहे. 18 नोव्हेंबरला या तरूणाने गावातीलच एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले होते. याप्रकरणी मुलीच्या वडीलांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. मुलीच्या बयानावरून आरोपीविरोधात लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुकुटबन रोडवर पेटूर या गावाच्या पुढे शिरगिरी हे एक छोटेचे पोड आहे. आरोपी विलास पोतू कुमरे शिरगिरी पोड येथील रहिवाशी आहे. त्याच गावात पीडित मुलगी राहते. ती 17 वर्षांची आहे. विलासने पीडित मुलीला आपल्या जाळ्यात अडकवले. दिवाळीच्या धामधुमीत विलासने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. याबाबत मुलीच्या वडिलांनी आरोपी विलास कुमरे विरुद्द पोलिसात तक्रार केली, पोलिसांनी आरोपीविरोधात कलम 363 अनव्ये गुन्हा दाखल केला.
आरोपीला बोर्डा येथून अटक
मुलीला पळवून आरोपी फरार होता. आरोपी पळून गेल्यामुळे पोलीस मोबाईल लोकेशनच्या मार्फत पीडिता आणि आरोपीचा शोध घेत होते. दरम्यान पोलिसांना आरोपी व मुलगी वणी तालुक्यातील बोर्डा येथे असल्याची माहिती मिळाली. दि. 24 नोव्हेंबरला पोलिसांनी बोर्डा येथे जाऊन आरोपीस अटक केली व अल्पवयीन मुलीची सुटका करून तिला पालकांच्या स्वाधीन केले.
मुलीच्या बयानावरून आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केल्याने आरोपीविरोधात कलम 376 व बाल लैंगिक अत्याचार (पोस्को) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी विलास पोतु कुमरे यास वणी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला 27 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडीत दिली. पुढील तपास सपोनि माया चाटसे व पो.कॉ. अविनाश बानकर करीत आहे.
हे देखील वाचा…
हे देखील वाचा…
हे देखील वाचा…