अडेगाव येथील तरुणाला बेदम मारहाण 

मारहाण झालेला तरुण 4 दिवसांपासून बेपत्ता

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अडेगाव येथील तरुण बंडू कवडू गोहणे वय २३ वर्ष हा १८ जून रोजी मुकूटबन येथून ५ हजार रुपये किमतीची दारू घेऊन जात असताना गावातीलच अनिल कुंटावार व त्यांच्या सहकार्यांनी गोहणे याची दुचाकी अडवून त्याला पकडले. त्याला अनिल कुंटावार व त्यांच्या तीन चार सहकाऱ्यांनी बेदम मारहाण केली व पोलिसांना पाचारण करून त्यांच्या स्वाधीन केले.

मुकूटबन पोलिसांनी गोहणेवर गुन्हा दाखल करून दारू व दुचाकी जप्त केली. कुंटावार व त्यांच्या सहकाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याने बंडू गोहणे यांच्या मनावर परिणाम झाला व १८ जूनच्या रात्री घर सोडून निघून गेला. ज्यामुळे गोहणे कुटुंबात चिंता पसरली व दुसऱ्याच दिवशी पोलीस स्टेशनला बंडू गोहणे घर सोडून गेल्याची तक्रार देण्यात आली.

१८ जूनला बंडू याला मारहाण झाल्याने त्याची मानसिकता खराब झाली होती व त्याच दिवशी मी जगत नाही मी मरतो अशी भाषा बोलत होता परंतु काही पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याची समजूत घातली होती. अखेर तो घर सोडून गेल्याने घरच्या कुटुंबात चिंता वाढली असून बंडूने स्वतच्या जीवाला काही केले तर नाहीना ?  असा प्रश्न कुटुंबियांना सतावत आहे.

बंडू गोहणेची आई कलाबाई कवडू गोहणे वय ५० वर्ष हिने २१ जून रोजी मुकूटबन पोलीस स्टेशन गाठून अनिल कुंटावार व त्यांचे चार पाच सहकारी यांच्याविरुद्ध तक्रार दिली. कुंटावार व त्यांच्या सहकाऱ्यांनी माझ्या मुलाला बेदम मारहाण केली ज्यामुळे त्याच्या मनावर परिणाम झाला व तो घर सोडून निघून गेला. ५ दिवस लोटूनही बंडू घरी आला नाही त्याला काही कमीजास्त झाल्यास याला सर्वस्वी जवाबदार मारहाण करणारे असेल अशी तक्रार देण्यात आली.

बंडू गोहणे हा लपून छपून दारू विक्रीचा धंदा करून आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करीत असल्याची कबुली त्याची आई कलाबाई हिने दिली. मुकूटबन व अडेगाव येथे खुलेआम अवैध दारू विक्री सुरू आहे. मुकूटबन येथून दिवस रात्र दुचाकी व चारचाकी गाडीने देशी दारूचा पुरवठा अडेगाव, खडकडोह घोंसा व चंद्रपूर जिल्ह्यात सुरू आहे तर मुकूटबनातील मच्छीमार सोसायटी व इतर ठिकाणी पहाटे ४ वाजेपासून तर ९ वाजे पर्यंत व सायंकाळी ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत खुलेआम विक्री करीत असतांना कुंटावार व त्यांच्या सहकार्यांना दिसत नाही का ?

माझ्या मुलाने दारू आणली तर त्याला पकडून बेदम मारहाण केली. कुंटावार व त्यांच्या सहकार्यांना माझ्या मुलाला मारण्याचा के अधिकार होता असा संतप्त प्रश्न उपस्थित करून त्यांच्यावर कारवाही झालीच पाहिजे अशी मागणी कलाबाई गोहणे व भाऊ कोंडू गोहणे यांनी केली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.