धाकट्या भावाचा मोठ्या भावावर चाकूने हल्ला

वणीतील भीमनगर येथील घटना

1

विवेक तोटेवार, वणी: शहरातील भीमनगर येथे राहणाऱ्या सख्या भावाने गुरुवारी दिनांक 10 जुन रोजी सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास क्षुल्लक कारणावरून आपल्या मोठ्या भावावर चाकूने हल्ला केला. यात मोठा भावाचा हाताला जखम झाली आहे. मोठया भावाच्या तक्रारीवरून वणी पोलिसात लहान भावावर गुन्हा दाखल केला आहे. सूरज असे जखमी झालेल्याचे नाव आहे.

Podar School 2025

फिर्यादी सूरज मोहन पुसाटे हा आई, भाऊ सागर व एक लहान बहिणीसोबत भीमनगर येथे राहतो. सूरजचा धाकटा भाऊ सागरला दारू पिण्याचे व्यसन आहे. गुरुवार सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास सागर हा दारू पिऊन घरी आला. त्याने आईबरोबर पैसे देण्याच्या कारणावरून वाद सुरू केला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हा वाद मिटविण्यासाठी सूरज गेला. परंतु सागरने सुरजच्या हातावर चाकूने वार केला. यामध्ये सुरजच्या तळहाताला जखम झाली. सोबतच त्याने आई व मोठा भाऊ सूरजला जीवे मारण्याची धमकी दिली. सूरजने या घटनेबाबत पोलिसात तक्रार दिली. त्याच्या तक्रारीवरून वणी पोलिसात आरोपी सागर मोहन पुसाटे (27) याच्यावर कलम 324, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. सदर घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा:

“लॉकडाउन” काळात इंदिरा सूतगिरणीचे ‘लॉक” तोडून चोरी

चारगाव चौकीवर सिनेस्टाईल पाठलाग करून दारू तस्कराच्या आवळल्या मुसक्या

Leave A Reply

Your email address will not be published.