कीटकनाशक प्राशन करुन तरुणाची आत्महत्या

शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वेळाबाई (मोहदा) येथील घटना

0

जितेंद्र कोठारी, वणी: शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वेळाबाई (मोहदा) येथील एका तरुणाने कीटकनाशक प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली. सुमित गजानन पुनवटकर (वय 22 वर्ष) असे मृत युवकाचे नाव आहे.

Podar School 2025

मृतक हा वेळाबाई येथील सोमेश्वर डवरे यांच्या शेतात मजुरी काम करीत होता. बुधवार 6 जानेवारीच्या रात्री 11 वाजता दरम्यान सुमितने शेतात जाऊन फवारणीचे कीटकनाशक प्राशन केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. माहिती मिळाल्यानंतर शिरपूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. मृत तरुण आपल्या आईवडीलाचा एकुलता मुलगा होता. पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहे.

हेदेखील वाचा

हेदेखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.