युवासेनातर्फे वणी येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे निषेध व स्वाक्षरी मोहीम

मराठी माणसाचा अपमान करणाऱ्या राज्यपालाना केंद्र सरकारने परत बोलावून घेण्याची मागणी

जितेंद्र कोठारी, वणी : हिंदूंमध्ये फूट पाडणाऱ्या आणि मराठी माणसाचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्राच्या राज्यपालाना केंद्र सरकारने परत बोलावून घ्यावे. या मागणीला घेऊन युवासेनातर्फे 31 जुलै रोजी वणी येथे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. येथील टिळक चौकात दुपारी 12.30 वाजता युवासेना कार्यकर्त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मराठी माणसाला अपमानित करणाऱ्या व्यक्तव्याचे निषेध केले.

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या आदेशानुसार यवतमाळ जिल्ह्यातील युवासेना विस्तारक दिलीप घुगे, शिवसेना जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर यांच्या मार्गदर्शनात युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत चचडा व उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या नेतृत्वात राज्यपाल कोश्यारी यांचे निषेध करण्यात आले.

यावेळी सतिश वारटे, चंद्रकांत गुगुल, निलेश बेलेकर, दिपंकर वनकर, विक्रम कुलकर्णी, राकेश माकडे, महेश चौधरी, मंगल भोंगरे, मोंटू वाधवानी, बंटी येरणे, कुणाल लोणारे, प्रफुल बोरडे, अमृत फुलझेले, सचिन पाटील, मकबूल शेख, शकील सिद्दीकी, रिंकू पठाण, शिवा शर्मा, पवन खुळसंगे, प्रवीण वरारकर तसेच युवासेना व शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.