वॉव… आता फुकटात करता येणार विमान प्रवास !

काही दिवसांत विमान कंपनीच देणार प्रवाशांना पैसे...

0

नवी दिल्ली: पुढील काळात विमान कंपन्या लोकांना फुकटात हवाई प्रवास घडवतील, असे वॉव एअरलाईन्सच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी म्हटले आहे. सध्या प्रवाशांना विमान प्रवासासाठी पैसे मोजावे लागतील. मात्र येत्या काही दिवसांमध्ये आम्ही तुम्हाला विमान प्रवास करण्याचे पैसे देऊ, असे वॉव एअरलाईन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्कूली मॉन्गसन यांनी म्हटले आहे.

वॉव एअरलाईन्सने २0१४ मध्ये हवाई सेवा देण्यास सुरुवात केली. चांगल्या हवाई सेवा स्वस्तात देणारी कंपनी यासाठी वॉव एअरलाईन्स ओळखली जाते. जानेवारीमध्ये वॉव एअरलाईन्सने अमेरिका ते युरोपीय देश हा विमान प्रवास अवघ्या ६९ डॉलरमध्ये (४,४९0 रुपये) प्रवाशांना उपलब्ध करून दिला. यानंतर जून महिन्यात कंपनीने तिकिटांचे दर आणखी कमी करत ५५ डॉलरपर्यंत आणले. कंपनी तिकिटांचे दर आणखी किती कमी करणार, असा प्रश्न मुख्य कार्यकारी अधिकारी स्कूली मॉन्गसन यांना विचारण्यात आला. यावर बोलताना ‘एक दिवस असाही उजाडेल, ज्या दिवशी आम्ही तुम्हाला विमान प्रवास करण्याचे पैसे देऊ’, असे मॉन्गसन यांनी म्हटले.

वॉव एअरने महसूली उत्पन्नासाठी विविध मार्गांचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे कंपनी केवळ तिकिटांच्या माध्यमातून होणार्‍या कमाईवर अवलंबून राहिलेली नाही. ही कंपनी ग्राहकांच्या गरजेनुसार सेवा पुरवते. तुम्हाला आवडते आसन हवे असेल, तुम्ही लवकर विमान पकडले असेल किंवा प्रवासात खाद्यपदार्थांची मागणी केली असेल, तर त्यानुसार वॉव एअरलाईन्सकडून सेवा शुल्क आकारले जाते. याशिवाय कंपनीने हॉटेल, रेस्टॉरंट्स, भाड्याने मिळणारी वाहने आणि पर्यटन क्षेत्रातील कंपन्यांशी निगडीत इतर सेवांसोबत भागिदारी केली आहे. या माध्यमातून वॉव एअरलाईन्सला मोठा महसूल मिळतो.

एखाद्या प्रवाशाला जर एखादी सेवा हवी असेल, तर वॉव एअरलाईन्सकडून केवळ त्याचेच पैसे घेतले जातात. उत्पन्नासाठी प्रवाशांच्या तिकिटावर अवलंबून राहावे लागू नये, असा आमचा प्रयत्न आहे. तिकिटांव्यतिरिक्त इतर मार्गांनी जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. ज्या विमान कंपनीला यामध्ये सर्वप्रथम यश येईल, ती कंपनी या क्षेत्रातील आर्थिक गणितांना मोठी कलाटणी देईल. जर एखाद्या कंपनीने नफ्यासाठी तिकिटावरील अवलंबित्व कमी केल्यास त्या कंपनीला तिकिटांचे दर कमी करता येतील. या कंपनीला पुढे जाऊन प्रवाशांना फुकट विमान प्रवासदेखील घडवून आणता येईल, असे असे वॉव एअरलाईन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्कूली मॉन्गसन यांनी म्हटले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.