पाथरी येथे वीज पडून गोठा जळाला

अंदाजे 90 हजारांचे झाले नुकसान, प्राणहानी टळली

0

विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील पाथरी येथील एका शेतात वीज पडून जनावरांचा गोठा जळाल्याची घटना दि. १५ सोमवारला सायंकाळी चार वाजता घडली. यात सुदैवाने प्राणहानी झाली नाही. मात्र संबंधित शेतकऱ्याचे अंदाजे 90 हजारांचे आर्थिक नुकसान झाले आहेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

वणी तालुक्यात सोमवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. यावेळी शिंदोला जवळच्या पाथरी येथील जगदीश पिंपळशेंडे यांच्या शेतातील जनावरांच्या गोठ्यावर वीज पडली. यात जनावरांचे वैरण (कुटार), शेती अवजारे, गोठ्याच्या छतावरील चाळीस नग टिन आदी साहित्य जळून खाक झाले.

यावेळी पिंपळशेंडे यांची जनावरे गोठ्यात बांधून नसल्याने प्राणहानी झाली नाही. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर घटनेचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.