नायगावजवळ पुन्हा अपघात : एक ठार एक जखमी

0

विवेक तोटेवार, वणी: सोमवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास वणी वरोरा रोडवर नायगाव शिवारात ऑटो व दुचाकीचा अपघात झाला. ज्यात दुचाकी चालक उपचारादरम्यान वणीच्या ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

सोमवारी सकाळी 11 वाजता सचिन शंकर लभाने (31) रा. भद्रावती व त्याचा मित्र विवेक पांडुरंग आत्राम दोघेही काही खाजगी कामाकरता वणीला येत होते. वाटेतच वणीच्या नायगाव शिवारात त्यांचा दुचाकी क्रमांक MH 34 BA 0931 चा आणि ऑटोचा अपघात झाला. याबाबत माहिती दुपारी 4.30 वाजता सचिनचा भाऊ अमित याला फोनवरून मिळाली. त्याने त्वरित घटनास्थळी धाव घेतली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

परंतु त्या ठिकाणी पोहचताच त्याला समजले की, सचिनला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेले आहे. अमितने ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली तर बघितले की सचिनच्या डोक्याला जबर जखम झाली आहे. त्या जखमेने सचिनचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेत सचिनचा मित्र विवेक जखमी झाला आहे.

याबाबतची तक्रार अमितने वणी पोलिसात केली आहे. त्याच्या तक्रारीवरून ऑटोचालक MH 29 म 7197 यांच्याविरुद्ध कलम 279, 337 व 304 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वृत्त लिहेपर्यंत ऑटोचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले नव्हते. घटनेचा तपास विठ्ठल बुरेवार करीत आहे. याअगोदर ही या ठिकाणी अनेक अपघात झाले आहेत. ज्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तरीही प्रशासन याबाबत जगरूक नसल्याचे दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.