आसोला येथील यात्रोत्सवात विविध कार्यक्रम

काठी मिरवणुक ठरली प्रमुख आकर्षण

0

प्रतिनिधी (मानोरा): असोला खुर्द येथे रामनवमी निमित्त काठीची मिरवणूक काढण्यात आली. दिनांक 18 एप्रिल रोजी काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत शेकडो भाविक सहभागी झाले होते. सकाळी सहा वाजता या मिरवणुकीला सुरुवात झाली. यात गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भजनी मंडळ लेझीम पथक व टाळ-मृदुंगाच्या गजरात ही मिरवणूक निघाली.

श्रीसंत सोहमनाथ महाराज यांची पालखी दुपारी तीन वाजता निघाली. याचे प्रमुख आकर्षण म्हणजे इथे निघालेली काठीची मिरवणूक. सोहमनाथ महाराज यात्रेनिमित्त ही मिरवणूक काढण्यात आली. या शोभायात्रेमध्ये संत श्री डॉ.रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटलचे संचालक तथा वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती आर्थिक विकास महामंडळाचे संचालक डॉ. श्याम जाधव (नाईक) यांची प्रमुख उपस्थिती ठरली.

मानोरा तालुक्यातील पोहरादेवी पाठोपाठ सर्वात मोठा यात्रोत्सव म्हणजे आसोला होय. या यात्रोत्सवात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते. बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवी येथे राम नवमी निमित्त सेवालाल महाराज जन्मोत्सव आयोजित केला जातो.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.