शाळेचा प्रश्न निकाली, वरांड्यात भरली होती शाळा

परमडोह जि. प. तीन लाखांचा निधी मंजूर

0
विलास ताजने, वणी: वणी तालुक्यातील परमडोह येथील जिल्हा परिषद शाळेचे छत जून महिनाच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या वादळात उडाले होते. २६ जून पासून शाळा सुरू होणार त्या अनुषंगाने प्रभारी सरपंच संदीप थेरे यांनी शाळेची डागडुजी करण्याची मागणी केली होती. मात्र प्रशासनाने साफ दुर्लक्ष केले. परिणामी विद्यार्थ्यांना वरांड्यात बसून पहिला दिवस घालवावा लागला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

ग्रामस्थांचा संताप पहाता प्रशासनाने तात्काळ कारवाई करीत तीन लाखांचा निधी मंजूर केला. पुढील आठवड्यात शाळेच्या डागडुजीला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
Leave A Reply

Your email address will not be published.