पूरग्रस्तांना 31 हजारांचा धनादेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप

शिवस्वराज्य यात्रेतील सभेत व्हीजेएनटी सेलकडून मदत

0

कारंजा: कोल्हापूर व सांगली येथील पूरग्रस्तांसाठी राष्ट्रवादी काँग्रेच्या व्हीजेएनटीसेल सेलतर्फे 31 हजार रुपयाचा धनादेश व 3 हजार वह्या देण्यात आल्या. मंगळवारी कारंजा येथे शिवस्वराज्य यात्रेदरम्यान सभा झाली. या सभेत अजित पवार, धनंजय मुंडे व डॉ. अमोल कोल्हे यांना व्हीजेएनटी सेलचे प्रदेशाध्यक्ष हिरालाल राठोड व जिल्हाध्यक्ष डॉ .श्याम जाधव (नाईक) यांच्या हस्ते धनादेश व वह्या सुपुर्द केल्यात.

पुरामध्ये जीवित हाणीसोबत मोठ्या प्रमाणात वित्त हाणी झाली आहे. राज्यभरातून पूरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरू आहे. त्यामुळे दैनंदिन जिवनावश्यक वस्तूंची समस्या सुटली आहे. मात्र पुरामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्याचे नुकसान झाले आहे. मुलांचे वह्या पुस्तके पुराच्या पाण्यात वाहून गेले किंवा पाण्यामुळे खराब झाले. असे असले तरी शिक्षणात खंड पडू नये यासाठी धनादेशासह वह्या देत असल्याची माहिती डॉ. श्याम जाधव (नाईक) यांनी दिली.

डॉ. श्याम जाधव यांच्या पूरग्रस्त भागातील आरोग्यसेवेचे कौतुक
डॉ. श्याम जाधव (नाईक) हे पूरग्रस्तांना आरोग्य सेवा देण्याकरिता त्यांच्या टीमसह कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात गेले होतो. तिथे त्यांनी दुर्गम अशा खेड्यात जाऊन पाच दिवस रुग्णांची तपासणी करत त्यांना आरोग्य सेवा दिली. त्यांच्या आरोग्य शिबिराला शरद पवार यांनी ही भेट दिली होती. शिवस्वराज्य यात्रेदरम्यान अजित पवार, धनंजय मुंडे व डॉ. अमोल कोल्हे यांनी डॉ. श्याम जाधव यांच्या पूरग्रस्त भागातील आरोग्य सेवेचा उल्लेख करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.