मानोरा: स्थानिक उमरी येथे पोळ्याबाबत अनोकी परंपरा आहे. गेल्या अऩेक वर्षांपासून ही परंपरा जोपासली जात आहे. विशेष म्हणजे कोणताही तंटा न होता आणि पोलिस बंदोबस्त नसतानाही गावकरी सामाजिक सलोखा जपून दोन दिवस पोळा साजरा करतात.
संध्याकाळी गावातील शेतकरी बांधव मोठ्या उत्साहात आपल्या बैलांना सजवून आणले होते. विविध प्रकारे सजवलेल्या बैलजोड्या या कार्यक्रमाचे आकर्षण होते. तर अनेक शेतकऱ्यांने सादर केलेल्या ‘गण’ या लोकगितामुळे मैदानावरील वातावरण भक्तीमय झाले होते.
हा पोळा दुस-या दिवशी ही भरवण्यात येतो. दुस-या दिवशीही बैलांची पूजा केली जाते. यावेळी गावाचे सुपुत्र व प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. श्याम जाधव (नाईक) यांची या उत्सवाला विशेष उपस्थिती होती. यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक विजय नाईक यांनी बैलांचे पूजन केले. या प्रसंगी विरसिंग पाटील, सुरेश जाधव, सुनील जाधव, संजय जाधव यांच्यासह गावकरी उपस्थित होते.
पोळ्यानिमित्त कारपा गावाला भेट
डॉ. श्याम जाधव (नाईक) यांनी मानोरा तालुक्यातील कारपा या गावात पोळ्या निमित्त भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील लोकांना पोळ्यानिमित्त शुभेच्छा देत गावातील समस्या जाणून घेतल्या. तसेच या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहील असे वचन ही दिले.