संगीतकार खय्याम यांना ‘फिर छिडी रात’मधून आदरांजली 22 ला

सोबतच अनेक दिग्गज संगितकारांच्या सुपरहिट गाण्यांचा नजराणा

0

बहुगुणी डेस्क, अमरावती: संगीतकार खय्याम यांचं वयाच्या 92व्या वर्षी निधन झालं. त्यांना आणि गतकाळातील चित्रपट संगीतकरांना आदरांजली वाहण्यासाठी संगीत कार्यक्रम स्थानिक टाऊन हॉलमधे होत आहे. सिंफनी गृप ऑफ मुझिक कल्चरल अॅण्ड वेलफेअर ट्रस्टद्वारा आयोजित हा कार्यक्रम रविवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता होईल.

खय्याम यांना ‘कभी कभी’, ‘उमराव जान’ चित्रपटांसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळालेले आहेत. 1947 पासून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली. त्यांची गाजलेली अनेक गीतं या कार्यक्रमात होतील. सोबतच संगीतकार आर. डी. बर्मन, कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, मदन मोहन, नौशाद, रवी, रवींद्र जैन यांनी संगीतबद्ध केलेली गाणीदेखील या कार्यक्रमाचं आकर्षण राहणार आहे.

अमरावतीकर आणि संगीत रसिकांसाठी पहिल्यांदाच या प्रोग्रामच्या ऑनलाईन सीट बुकिंगची व्यवस्था केली आहे. ‘बूक माय सीट’ Book My Seat हे अॅप डाउनलोड करून आपली जागा राखीव करता येते. तसेच संस्थेच्या विविध सामाजिक संगीत विषयक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची माहिती डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट सिंफनी अमरावती डॉट कॉम  https://www.symphonyamravati.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती सिंफनी ट्रस्टचे अध्यक्ष सचिन गुडे, प्रणिता गुडे, जयंत वाणे, गुरुमूर्ती चावली, प्रा. रोमहर्ष बुजरूक आणि पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.