निकेश जिलठे, वणी:वणीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपालिकेने आवश्यक ती पावलं उचलली आहे. आज दिनांक 23 मार्च सोमवारी वणीतील मुख्य रस्त्यांवर फायरब्रिगेडद्वारा सोडीयम हायड्रोक्लोराईड या केमिकलची फवारणी करण्यास सुरूवात झाली आहे. आज वणीतील टीळक चौक परिसरातून फवारणीला सुरूवात करण्यात आली असून ही फवारणी यवतमाळ रोड येथील रेल्वे फाटक पर्यंत. साईमंदीर ते नांदेपेरा रोड रेल्वे फाटक, टिळक चौक ते वरोरा रोड रेल्वे फाटक, खाती चौक ते जत्रा मैदान अशा शहरातील मुख्य रोडवर करण्यात येणार आहे.
मुख्य रस्त्यावरील फवारणी झाल्यानंतर शहरातील ज्या भागात फायरब्रिगेडची गाडी जाऊ शकते त्या संपूर्ण भागात जाऊन फवारणी केली जाणार आहे. त्यासोबतच स्वच्छतेसाठी संपूर्ण प्रभागात फॉग मशिनचा वापर केला जात आहे. नगर पालिकेकडे असलेल्या नादुरुस्त असलेल्या फॉग मशिन दुरुस्त करण्यात आल्या असून एकूण पाच मशिनचा वापर निर्जंतुकीकरणासाठी वापरण्यात येत आहे.
उद्यापासून प्रभागासाठी 2 नवीन फवारणी मशिन: नगराध्यक्ष सध्या वणीमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नसला तरी खबरदारी म्हणून नगरपालिकेने योग्य ती उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे. सध्या फायरब्रिगेडच्या गाडीद्वारा फवारणी सुरू आहे. मात्र गल्लीमध्ये तसेच आतील भागात गाडी जाणे शक्य नसते. त्यासाठी नवीन फवारणी दोन मशिन बोलवण्यात आली आहे. आज संध्याकाळ पर्यंत (सोमवारी) ही मशिन वणीत येणार असून उद्यापासून सोडीयम हायड्रोक्लोराईडच्या फवारणीचे काम सुरू आहे. एका दिवसात तीन प्रभाग निर्जंतुकीकरणाचे ध्येय आहे. – नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे
अशा दोन फवारणी मशिन होणार वणीत दाखल
वणीमध्ये परदेशातून आलेल्या व देशांतर्गत प्रवास करून आलेल्या व्यक्तींना काही दिवसांसाठी ‘होम कॉरेन्टाईन’ करण्यात आले आहे. त्यांच्या हातावर होम कॉरेन्टाईनचा शिक्का मारण्यात आला आहे. तसेच आता वणी शहर निर्जंतुकीरणाला सुरूवात झाली आहे. वणीमध्ये एकही रुग्ण नसले तरी लोकांनी घोळक्याने एकत्र येऊ नये तसेच सोशल मीडियावरून अफवा पसरवू नये असे आवाहनही नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी केले.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.