वणीत फक्त ‘इथेच’ मिळणार भाजी आणि फळं

इतर ठिकाणी भाजी व फळाच्या किरकोळ विक्रीस प्रतिबंध

0

निकेश जिलठे, वणी: भाजी मंडई बंद करण्याच्या निर्णय घेण्यात आल्यानंतर गर्दी टाळण्यासाठी आता केवळ मोजक्या चौकातील काही किरकोर भाजी व फळ विक्रेत्यांना परवानगी देण्यात आली आहे. उद्या बुधवारपासून हा निर्णय लागू राहणार आहे. मुख्याधिकारींनी प्रसिद्धी पत्रक काढून याबाबत माहिती दिली आहे.

कोणत्या चौकात किती दुकान राहणार सुरू?
दीपक टॉकीज चौक – 10 दुकान
साई मंदिर चौक – 10 दुकान
एल टी कॉलेज चौक – 10 दुकान
पंचशील चौक – 10 दुकान
टिळक चौक – 10 दुकान
सर्वोदय चौक – 10 दुकान
गांधी चौक – 10 दुकान
भाजी मार्केट चौक – 10 दुकान
शिवनेरी चौक – 5 दुकान
बस स्टॅन्ड चौक – 5 दुकान
डॉ. भटारकर यांच्या घराजवळील चौक – 5 दुकानं
शाळा क्रमांक 5 जवळ – 4 दुकान
काठेड चौक – 4 दुकान
विराणी टॉकीज जवळ – 4 दुकान
राजीव गांधी चौक (एसपीएम शाळा) – 5 दुकानं

या व्यतिरिक्त कुणी किरकोळ स्वरूपात भाजी अथवा फळ विकताना दिसल्यास त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. तसेच लोकांनी योग्य ते अंतर ठेवून खरेदी करावी असेही आवाहन करण्यात आले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.