जयंत सोनोने, अमरावती: धोबी समाजाला अनुसूचित जातीत समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी मागणील ७० वर्षापासून केली जात आहे. मात्र याप्रकरणी अद्यापही शासनस्तरावरुन योग्य कार्यवाही करण्यात आली नाही. या मागणीवर येत्या काही दिवसांत विचार न झाल्यास दि. ४ सप्टेंबर पासून अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य धोबी परीट समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण शेंदरे यांनी दिली.
धोबी समाज बांधवांना आरक्षण देण्यात यावी ही मागणी मागील ७० वर्षापासून सुरु आहे. त्यासाठी वेळोवेळी आंदोलने करण्यात आली. परंतू, अद्यापही मागणी निकाली काढण्यात आलेली नाही. धोबी समाजाला न्याय देण्यासाठी २००२ मध्ये डॉ. भांडे समिती नेमण्यात आली. त्यांनी या समाजाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करण्यात यावे अशी शिफारस केली.
मात्र राज्य सरकारयाकडे दुर्लक्ष करीतअसल्याचा आरोप धोबी-परिट महासंघाच्या वतीने करण्यात आला. सदर मागणी तात्काळ निकाल न निघाल्यास दि. ४ सप्टेंबरपासून अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रवीण शेंटरे, कार्याध्यक्ष रमेश तायवाडे, जिल्हा सचिव विनोद बाभुळकर, कोषाध्यक्ष रामदास भाग्यवंत, उपाध्यक्ष सुरेश नायडकर, श्रीकांत शेंडे, राजेश गवळी, दिनेश गारले, संदीप उमेकर, किशोर मुंदे, रमेश निबांळकर, गोपालक मोकळकर, प्रमोद जावेकर, दिवाकर तायवाडे, गजानन केवतकर, जिल्हा संघटक मुकेश उंबरकर, श्रीधर करंडे, ऋषी शहाकार, प्रा. संदीप रोहणकर यांनी दिली.