आज मारेगाव तालुक्यात कोरोनाचे 4 रुग्ण

सर्व पॉजिटिव्ह कुंभा येथील रहिवाशी

0

नागेश रायपुरे, मारेगाव: आज गुरुवारी दिनांक 17 जून रोजी तालुक्यात 4 व्यक्ती पॉजिटिव्ह आल्या आहेत. हे सर्व कुंभा येथील रहिवाशी आहेत. यात 3 महिला तर एका पुरुषाचा समावेश आहे. सध्या तालुक्यातील 13 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. सध्या तालुक्यात 27 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अद्याप 43 जणांचा पाठविलेला अहवाल येणे बाकी असल्याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिली आहे.

ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्ग मोठया प्रमाणात वाढत असून आता मारेगाव शहरासह तालुक्यातही कोरोनाने आपले पाय पसरविणे सुरू केले आहे. नागरिकात पॉझिटिव्ह असलेला परिसरातील काही भाग प्रतिबंधित करण्याच्या प्रक्रिया सुरू होती. पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कातील नागरिकांचे नाव ट्रेस करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली असून नागरिकांनी प्रशासनाकडून सांगितलेल्या नियम व अटीचे पालन करावे असे आवाहन तालुका प्रशासनाकडुन करण्यात आले आहे.

13 रुग्णांची कोरोनावर मात
सध्या तालुक्यात 40 रुग्ण असून यातील 13 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. सध्या तालुक्यात 27 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. आधी शहरात असलेला कोरोना आता ग्रामीण भागात झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची चिंता वाढली आहे. दरम्यान कोरोनाचा संसर्ग वाढूू नये म्हणून मारेगाव शहरात चार दिवसांचा जनता कर्फ्यूचे आयोजन करण्यात आले आहे. 

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.