साखरा गावात कोरोनाचा शिरकाव

चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरु

0

अमोल पानघाटे,साखरा (को):  वणी तालुक्यातील साखरा (को)या गावात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. इथल्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीवर चंद्रपूर येथील  जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर व्यक्तीस मागील सात ते आठ दिवसांपासून बारीक बारीक ताप येत होता. त्यामुळे चंद्रपूर येथे ते उपचार करण्यासाठी गेलेत. तेव्हा त्यांनी कोरोनाची चाचणी केली. त्यात त्यांचा अहवाल पॉजिटिव्ह आला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

त्या व्यक्तीवर चंद्रपूर येते सध्या उपचार सुरू आहेत. ती व्यक्ती राहत असलेला परिसर कोरोना प्रतिबंधक घोषित झाला आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव ही सगळ्यांच्याच काळजीची बाब झाली आहे. कोरोनाच्या प्रसार होऊ नये यासाठी पुरेशी खबरदारी घेणे आवश्यक आहे. प्रशासन त्यासाठी विविध माध्यमांतून जागृती करीतच आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.