सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यात कोरोनाचा तांडव झाला. आज शनिवार 31 ऑक्टोबर रोजी 9 व्यक्ती पॉजिटिव्ह आल्यात. त्यासोबतच इथली एकूण रुग्णसंख्या आता 14 झाली आहे. हे रुग्ण रेल्वे कॉर्टर आणि विद्यानगरी परिसरात आढळलेत.
या आधी 24 ऑक्टोबरला दीड वर्षाच्या चिमुकला कोरोना पॉजिटिव्ह आला. त्यानंतर तो परिसर प्रतिबंधित करण्यात आला. तेथील 15 लोकांचे स्वॅब पाठविण्यात आलेत. ते सर्व निगेटिव आलेत. त्यानंतर रेल्वे क्वार्टरमधील बाहेर तपासणी केली असता, एक व्यक्ती पॉजिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले.
यावरून आरोग्यविभागाने रेल्वे क्वार्टरमध्ये राहणाऱ्या 50 लोकांची तपासणी केली. पहिल्या रिपोर्टमधे 17 पैकी 5 व दुसऱ्या रिपोर्ट मधे 30 पैकी 4 असे 9 जण पॉजिटव्ह आलेत.
यातील एक मुलगा 14 वर्षाच्या आहे. त्याला व एका व्यक्तीला सुविधा असल्याने होम क्वॉरंटाईन करण्यात आले. एक व्यक्तीला यवतमाळ हलविंण्यात आले. शनिवारी 31 ऑक्टोबररोजी तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन गेडाम, तहसीलदार गिरीश जोशी, ठाणेदार धर्मा सोनुने यांनी आपली चमू घेऊन रेल्वे कार्टरवरील कोरोना पॉजिटिव्ह रुग्णांना झरी येथील नगरपंचायतीच्या कोविड सेंटरला ठेवले. सदर परिसर प्रतिबंध करण्यात आला.
मुकुटबन ग्रामवासियांत कोरोनाची मोठी दहशत निर्माण झाली. तरीही संपर्कात आलेले तरुण बिनधास्त गावात फिरताहेत. सोशल डिस्टन्सिंगची पालन अनेक ठिकाणी होताना दिसत नाही. कंटेन्मेंट झोनच्या ठिकाणी पोलिसांची ड्यूटी नसते का,असा प्रश्न उपस्थित होत आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)