जब्बार चीनी, वणी: आज बुधवारी 11 नोव्हेंबरला 12 कोरोना पॉजिटिव्ह आढळलेत. आतापर्यंत तालुक्यातले कोरोनाचे प्रमाण कमी होते. मंगळवारी अचानक कोरोनाचे 23 पॉजिटिव्ह निघालेत. कालच्या तुलनेत आज ही संख्या कमी आहे. तरीही या आठवड्याच्या तुलनेत ही संख्या जास्तच आहे.
आज आलेल्या रुग्णांत वणी शहरात 9, सुकनेगाव येथे 2 तर चिखलगाव येथे 1 कोरोना पॉजिटिव्ह आढळला. आज यवतमाळ हून 40 अहवाल प्राप्त झालेत. 21 रॅपिड अँटीजण टेस्ट तर 3 पॉझिटिव्ह रॅपिड टेस्ट करण्यात आल्यात. तर 31 व्यक्ती निगेटिव्ह आल्यात. आज आलेल्या रुग्णांवरून 14 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. अद्याप यवतमाळहून 18 अहवाल येणे बाकी आहे.
तालुक्यात 71 ऍक्टिव्ह रुग्ण
सध्या तालुक्यात एकूण 856 पॉजिटिव्ह रुग्ण झालेत. यातील 782 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. आज 7 व्यक्ती कोरोनामुक्त व्यक्तींना सुटी झाली. सध्या तालुक्या 71 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 38 जण होम आयसोलेट आहेत. 33 जणांवर परसोडा येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. कोरोनामुळे तालुक्यात मृत्यूची संख्या 21 झाली आहे.
दिवाळीच्या तोंडावर सावधगिरी आवश्यक
गेल्या काही दिवसांत शहरातील रुग्णसंख्या कमी होत असताना आता अचानक शहरातील रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे.. एकीकडे दिवाळी जवळ येत असताना अचानक शहरात रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने ही चिंतेची बाब बनली आहे. शहरात ग्रामीण भागातून दिवाळीच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात ग्राहक येतात. जर शहरातील रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर ही धोक्याची घंटा ठरू शकते.