जब्बार चीनी, वणी: रविवारी दिनांक 29 नोव्हेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 7 रुग्ण आढळलेत. यातील 5 रुग्ण वणी शहरातील आहे तर 2 रुग्ण ग्रामीण भागातील आहे. आज वणी शहरात एकता नगर येथे 2 रुग्ण, एसएचओ क्वॉर्टर येथे 2 तर गुरुनगर येथे 1 रुग्ण आढळून आला. तर नांदेपेरा व कायर येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला. कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहावे. कोरोनाकाळात योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
रविवारी यवतमाळ येथून 32 रिपोर्ट आलेत. यात 6 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत व 26 व्यक्ती निगेटिव्ह आलेत. आज 8 व्यक्तींची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट घेण्यात आली. यात एक व्यक्ती पॉजिटिव्ह आला तर इतर निगेटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 11 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. अद्याप यवतमाळहून 34 अहवाल येणे बाकी आहे.
तालुक्यात 62 ऍक्टिव्ह रुग्ण
सध्या तालुक्यात एकूण 969 पॉजिटिव्ह रुग्ण झालेत. यातील 884 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. रविवारी 6 कोरोनामुक्त व्यक्तींना सुटी देण्यात आली. सध्या तालुक्यात 62 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 31 जण होम आयसोलेट आहेत. 09 जणांवर कोविड केअर सेंटरमध्ये तर 22 रुग्णांवर यवतमाळ आणि अन्य ठिकाणी उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे आतापर्यंतची तालुक्यातली मृत्यूसंख्या 23 आहे.
सावधगिरी बाळगणे तेवढेच महत्त्वाचे
गेल्या काही दिवसांत शहरातील रुग्णसंख्या कमी होत असताना आता अचानक शहरातील रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. याशिवाय शहरात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या महिन्यात हा आकडा 20 च्या खाली आला होता. मात्र गेल्या दोन आठवड्यापासून हा आकडा सातत्याने वाढत आहे. सध्या कोरोनाची भीती गेल्याने अनेकांनी सावधगिरी बाळगणे कमी केले आहे. त्यामुळेही रुग्ण वाढण्यास मदत होत आहे.
हे पण वाचा…
पिंपरी-महाकालपूर परिसरातील कोंबड बाजारावर पोलिसांची धाडसी कारवाई
हे पण वाचा…
[…] आज कोरोनाचे 7 रुग्ण, शहरात रुग्णांच्या… […]