मुकुटबन येथील गुरुकुल कॉन्व्हेंटच्या वैदेहीने केली कमाल
शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत झळकली
सुशील ओझा, झरी: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे अंतर्गत माहे फेब्रुवारी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 5वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 वीची जिल्हानिहाय आणि तालुकानिहाय गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली. या गुणवत्तायादीत मुकुटबनच्या गुरुकुल कॉन्व्हेंटची विद्यार्थिनी वैदही मारोती मेश्राम ही झरी तालुक्याच्या शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत झळकली. ती सध्या इयत्ता नववीत आहे.
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवून शाळेचा तसेच तालुक्याचा गौरव तिने वाढविला आहे. वैदही मेश्रामने देदीप्यमान यशाला गवसणी घालून शाळेच्या प्रगतीत आणखी एक यशाचा तुरा रोवला.
गुरुकुल कॉन्व्हेंट येथील एकूण 5 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झालेत. वैदहीने जिद्द, चिकाटी, मेहनत आणि शिक्षकांचे उल्लेखनीय मार्गदर्शन यामुळे हे यश संपादन केले. या अगोदरही प्रत्येक वर्षी या शाळेचे अनेक विद्यार्थी इयत्ता दहावी बोर्डाच्या गुणवत्ता यादीत, शिष्यवृत्ती पात्रता तसेच गुणवत्ता यादीत आणि शासनाने घेतलेल्या विविध परीक्षांमध्ये झळकलेत. ही एक वैशिष्ट्य पूर्ण बाब आहे.
वैदहीला या यशासाठी शाळेच्या सर्व शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन लाभले. वैदहीने आपल्या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक सुभाष गजभिये, सर्व शिक्षकवृंद, आई वडील आणि शाळेच्या व्यवस्थापणाला दिले. शाळेच्या तसेच संस्थेच्यावतीने मुख्याध्यापक गजभिये यांनी वैदहीचे अभिनंदन केले.
हेदेखील वाचा
पिंपरी-महाकालपूर परिसरातील कोंबड बाजारावर पोलिसांची धाडसी कारवाई
हेदेखील वाचा