युवकाने उभारली रक्तदान जनजागृतीची चळवळ

रक्तदूत प्रफुल भोयर यांचे नागरिकांना रक्तदानाचे आवाहन

1

सुशील ओझा, झरी: गरजू व्यक्तींना रक्तदान करणे आधुनिक आरोग्य देखभाल प्रणालीमध्ये मानवतेच्या महत्वपूर्ण भाग बनला आहे. स्वैच्छिक रक्तदान कोणत्याही मनुष्यासाठी वास्तविक मानवता आहे. कारण रक्तदान अनेक जिवांना वाचवू शकतो. हे लक्षात घेऊन रक्तदानाविषयी समाजात पसरलेल्या गैरसमजूती दूर करुन रक्तदाते वाढविण्यासाठी रक्तविर बहुउद्देशीय संस्थेच्या प्रफुल भोयर यांनी रक्तदान जनजागृतीची चळवळ उभारली आहे.

त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील आणि त्यांच्याशी जोडलेल्या वेगवेगळ्या लोकांमधील सहकार्यासाठी प्रयत्न केला आहे. रक्तदान करण्यासाठी सुरक्षित रक्ताची गरज या विषयावर सार्वजनिक जागरूकता वाढविण्यासाठी सहज संधी उपलब्ध केल्या आहेत. शिबिरे राबविणे, रक्तदाते तयार करणे, कवितेच्या माध्यमातून जनजागृती व रक्तदानाचे महत्त्व सांगणे, गरजु, गरीब रुग्णांना मोफत रक्त व रक्तदाते उपलब्ध करुन देणे या माध्यमातून प्रफुल भोयर हे रक्तदान क्षेत्रात अग्रेसर आहे.

लोकांमध्ये मानसिक बदल घडवून आणण्याची बाब जेव्हा समोर येते तेव्हा तरुणांना जागृत करणे, शिक्षित करणे आणि संवेदनशील बनवणे, हीच भूमिका महत्त्वाची ठरते. तातडीच्या वेळी माणुसकीच्या स्वैच्छिक रक्तदान करण्याचा सामाजिक प्रघात निर्माण होणे गरजेचे आहे. प्रफुल भोयर यांच्याकडून रक्तदानाचा विविध पैलूंबद्दल संवेदनशील बनवणारे कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

त्यानिमित्ताने प्रफुल भोयर यांनी नवीन रक्तदाते तयार करणे, रक्तदानाविषयी जनजागृती करणे, रक्तदानास प्रोत्साहित करणे, रक्तदान केलेल्यांना अभिवादन करणे, त्यांना आत्मसन्मान मिळवून देणे ही मोहीम हाती घेतली आहे.

हेदेखील वाचा

ट्रकच्या चाकात येऊन चालकाचा मृत्यू

हेदेखील वाचा

आदर्श विद्यालयात नानासाहेब गोहोकार यांचा स्मृतिदिन

1 Comment
  1. […] युवकाने उभारली रक्तदान जनजागृतीची चळ… […]

Leave A Reply

Your email address will not be published.