आदर्श विद्यालयात नानासाहेब गोहोकार यांचा स्मृतिदिन

मार्डी येथे वृक्षारोपण आणि अन्य उपक्रम

1

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील मार्डी येथील आदर्श माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब गोहोकार यांचा स्मृतीदिनी अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक ज्ञा. का. चटकी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक पंढरी बोबडे, रमेश ढुमणे, नीतू मेश्राम उपस्थित होते. नानासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण करण्यात आले. याप्रसंगी मंचावरील उपस्थित पाहुण्यांनी नानासाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकला.

पाहुण्यांच्या हस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भास्कर राऊत यांनी केले. संचालन विलास ताजने यांनी केले. अनंता शिवरकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला शिक्षक सुधीर गाडगे, एकनाथ ऐटी, लता वातीले, अंकुश कांबळे, बी.डी.जीवतोडे, जी.के.कवाडे यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

हेदेखील वाचा

साप चावल्यावर त्याने चक्क आपलं बोटच तोडलं

हेदेखील वाचा

डोर्लीत झाला हनुमान मंदिराचा लोकार्पण सोहळा

 

1 Comment
  1. […] आदर्श विद्यालयात नानासाहेब गोहोकार य… […]

Leave A Reply

Your email address will not be published.