जितेंद्र कोठारी, वणी: येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात शनिवारी 12 डिसेंबर रोजी “राष्ट्रीय लोक न्यायालया”चे आयोजन करण्यात आले. लोकन्यायालयात वणी पोलीस ठाण्यात दाखल व न्यायालयात प्रलंबित असलेल्या तब्बल 411 फौजदारी प्रकरणांचा आपसी तडजोडीने निपटारा करून 4 लाख 11 हजार 200 रुपये दंड वसूल करण्यात आला.
लोक न्यायालयाचे उद्घाटन तालुका विधी सेवा समिती वणीचे अध्यक्ष के.के. चाफले व दिवाणी न्यायाधीश (क.स्त.) वणी यांच्या हस्ते करण्यात आले. त्वरित आणि जास्तीत जास्त प्रकरणांचा निपटारा करण्याच्या उद्देशाने लोकन्यायालयात दोन पॅनलची व्यवस्था करण्यात आली. एका पॅनलचे न्यायाधीश म्हणून के. के. चाफले तर दुसऱ्या पॅनेलचे न्यायाधीश एस.बी.तिवारी यांनी सुनावणी केली.
लोक न्यायालयाच्या यशस्वीतेसाठी न्यायालयाचे सहा. अधीक्षक आर.व्ही. बढिये, कनिष्ठ लिपिक एस.एस.निमकर तसेच न्यायालयीन कर्मचारी व वकील मंडळींनी परिश्रम घेतले.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा