‘तिला’ झाली गर्भधारणा तरीही “हा” लग्न करेना

लग्नाचं वचन देऊन शोषण करणाऱ्या युवकाविरुद्द गुन्हा दाखल

0

जितेंद्र कोठारी, वणी:तिच्या’सोबत लग्न करण्याचे वारंवार खोटे आश्वासन देऊन त्याने मागील चार महिन्यांपासून तिच्यासोबत दुष्कर्म केले. परंतु तिला गर्भधारणा झाल्यानंतर त्याने आपले खरे रूप दाखविले. अचानक त्याने तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. अखेर पीडित तरुणीने शनिवार 12 डिसेंबर रोजी कथित ‘प्रियकरा’विरुद्ध वणी पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार नोंदवली.

Podar School 2025

25 वर्षीय पीडित तरुणी ही मारेगाव तालुक्यातील रहिवासी आहे. सध्या ती वणीत वास्तव्यास आहे. वणीतील आंबेडकर चौकातील रूपेश सुरेश क्षीरसागर (31वर्ष) सोबत तिची ओळख झाली. नंतर दोघांत प्रेमसंबंध निर्माण झालेत. रूपेश याने तिच्यासोबत लग्न करतो, अशा भूलथापा दिल्यात.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

तसेच मागील 4 महिन्यांपासून त्याने पीडित तरुणीसोबत अनेकवेळा दुष्कर्म केले. या कृत्यामुळे तरुणीला गर्भधारणा झाली. पीडितेने रूपेशला लग्न करण्याचा तगादा लावला. मात्र आरोपी रुपेश क्षीरसागर याने पीडितेसोबत लग्न करण्यास नकार दिला.

अखेर पीडितेने वणी पोलीस ठाणे गाठले. रूपेश सुरेश क्षीरसागर (31) रा. आंबेडकर चौक वणी याच्याविरुद्ध तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम 376सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केले आहे. गुन्हा दाखल होण्याची माहिती मिळताच आरोपी फरार झाला. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

हेदेखील वाचा

हेदेखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.