आज तालुक्यात 7 पॉजिटिव्ह

शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाबाधित

0

जब्बार चीनी, वणी: शुक्रवारी दिनांक 18 डिसेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 7 रुग्ण आढळलेत. यातील वणी शहरातील विठ्ठलवाडी 1, वामनघाट रोड 1, शिंदोला माईन्स 2, चिखलगाव 1, पठारपूर 1, भालर टाउनशिप 1 असे पेशंट्स आढळलेत. कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहावे. कोरोनाकाळात योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

शुक्रवारी यवतमाळ येथून 95 रिपोर्ट आलेत. यात 4 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत व 91 व्यक्ती निगेटिव्ह आलेत. आज 27 व्यक्तींची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट घेण्यात आली. यात 3 व्यक्ती पॉजिटिव्ह आल्यात. आज आलेल्या रुग्णांवरून 37 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. अद्याप यवतमाळहून 80 अहवाल येणे बाकी आहे.

तालुक्यात 64 ऍक्टिव्ह रुग्ण
सध्या तालुक्यात एकूण 1070 पॉजिटिव्ह रुग्ण झालेत. यातील 983 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. शुक्रवारी 10 कोरोनामुक्त व्यक्तींना सुटी देण्यात आली. सध्या तालुक्यात 64 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 25 जण होम आयसोलेट आहेत. 18 जणांवर कोविड केअर सेंटरमध्ये तर 21 रुग्णांवर यवतमाळ आणि अन्य ठिकाणी उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे आतापर्यंतची तालुक्यातली मृत्यूसंख्या 23 आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सावधगिरी बाळगणे तेवढेच महत्त्वाचे
गेल्या काही दिवसांत शहरातील रुग्णसंख्या कमी होत असताना आता अचानक शहरातील रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. याशिवाय शहरात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या महिन्यात हा आकडा 20 च्या खाली आला होता. मात्र गेल्या दोन आठवड्यापासून हा आकडा सातत्याने वाढत आहे. सध्या कोरोनाची भीती गेल्याने अनेकांनी सावधगिरी बाळगणे कमी केले आहे. त्यामुळेही रुग्ण वाढण्यास मदत होत आहे.

हेदेखील वाचा….

शिरपूर-मेंढोली फाट्यादरम्यान अपघात, महिलेचा जागीच मृत्यू

हेदेखील वाचा….

बेलोरा व चारगाव चौकीवर दारुची तस्करी करताना दोघांना अटक

 

Leave A Reply

Your email address will not be published.