वाघाने केली गायीची शिकार, पाथरी येथील घटना
शिंदोला परिसरात पट्टेदार वाघाचा मुक्त संचार, परिसरात दहशत
तालुका प्रतिनिधी, वणी: शिंदोला येथील स्मशानभूमी परिसरात बुधवारी रात्री आठ वाजता ट्रक चालकांना वाघ दिसला. तसेच रात्री दरम्यान वाघाने पाथरी येथील गाईची शिकार केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे शेतकरी आणि सिमेंट कंपनीत रात्रपाळीत कामाला येजा करणाऱ्या कामगारांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
वणी तालुक्यातील शिंदोला ते पार्डी रस्त्याच्या कडेला असलेल्या स्मशानभूमी परिसरात बुधवारला रात्री सिमेंट कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना पट्टेदार वाघ दिसला. हरिभाऊ बोंडे, संतोष भगत आणि राजू ताजने पार्डी खाण परिसरातून ट्रकने येताना पट्टेदार वाघ सिमेंट रस्त्यावरून मार्गक्रमण करताना दिसला. सदर माहितीची खात्री करून घेण्यासाठी गावातील तरुण सकाळी सदर परिसरात गेले. यावेळी रस्त्यावर वाघाच्या पावलांचे ठसे आढळून आले.
तसेच दुसऱ्या घटनेत लगतच्या पाथरी येथील गजानन नागतुरे यांच्या गाईला ठार मारल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. सकाळी गावालगत सदर गाय मृतावस्थेत आढळून आली. ग्रामस्थांनी चौकशी केली असता गाईची वाघाने शिकार केल्याचे लक्षात आले. घटनास्थळी वाघाच्या पावलांचे ठसे आढळून आले. सदर घटनेचा वनविभागाने पंचनामा केला आहे.
हे पण वाचा:
हे पण वाचा: