रवि ढुमणे, वणी: मारेगाव कडून वणीकडे मारुती कार मध्ये दारू येत असल्याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक संगीता हेलोंडे व पोलिसांनी नांदेपेरा चौफुलीवर सापळा रचून चंद्रपुरातील दोन दारू तस्करांना 3 लाख 30 हजाराच्या मुद्देमालासह रंगेहाथ पकडले.
वणी पोलिसांना मंगळवारी मारेगाव कडून मारुती कार क्रमांक एम एच 31 सिपी 9456 एस एक्स 4 ने चंद्रपूर कडे दारू भरून नेत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे, ठाणेदार मुकुंद कुळकर्णी यांचे मार्गदर्शनात डीबी पथक प्रमुख संगीता हेलोंडे, डोमा भादीकर, शेख नफिस, सुनील खंडागळे, सुधीर पांडे,रत्नपाल मोहाडे, दीपक वांड्रसवार, इम्रान खान यांनी नांदेपेरा चौफुलीवर सापळा रचून नाकाबंदी केली.
दारू भरलेली मारुती येताच त्यावर झडप घातली व तपासणी करायला सुरुवात केली असता डॅशबोर्ड मध्ये लपवून ठेवलेल्या 200 विदेशी दारूच्या शिश्या ज्याची किंमत तीस हजार सह संतोष नामदेव चंदनखेडे, प्रशांत वामन चंदनखेडे राहणार जयश्री गार्डन जवळ चंद्रपूर या दोघांना एकूण 3 लाख 30 हजार रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले.