टाटा सुमोतून शक्कल लढवून केली दारूची तस्करी 

चंद्रपुरातील युवक वणी पोलिसांच्या ताब्यात

0

रवि ढुमणे, वणी: लालपुलिया परिसरात सापळा रचून स्वामी पोलिसांनी टाटा सुमोतून १ हजार दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या आहेत. यावेळी गाडी चालक युवकाला पोलिसांनी अटक केली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

टाटा सुमोतून चंद्रपुरात अवैधरित्या दारू नेत असल्याची भनक वणी पोलिसांना लागताच त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे व ठाणेदार मुकुंद कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनात डीबी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक संगीता हेलोंडे, सुनील खंडागळे, सुधीर पांडे,रत्नपाल मोहाडे, इम्रान खान,दीपक वांड्रसवार आदींनी लालपुलिया परिसरात सापळा रचला.

एम एच 33 ए 0804 ला अडवून तपासणी केली असता गाडी चालक मनोज उर्फ विनोद भारत टेकाम ३० रा शिरणाळा (चंद्रपूर)याने टाटा सुमो च्या खालील भागात टिनपत्र्याची पेटी तयार करून त्यात देशी दारूच्या १ हजार बाटल्या किंमत ३० हजार रुपये व वाहन अडीच लाख किमतीचे वाहन असा एकूण २ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

Leave A Reply

Your email address will not be published.