तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

चोपण येथील घटना

0

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात आत्महत्येचे सत्र चालूच असताना पुन्हा एका तीस वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली. चोपण येथे बुधवारी दिनांक 10 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजताचे दरम्यान ही घटना उघडकीस आली. प्रवीण दिगांबर गोवारदीपे (30) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकरी पुत्राचे नाव आहे.

मार्डी पासून नजीक असलेल्या चोपण येथील अल्पभूधारक शेतकरी दिगांबर गोवरदीपे यांचा एकुलता एक मुलगा प्रवीण याने सततची नापिकी व कर्जबाजारीला कंटाळून आत्महत्या केल्याचे बोल जात आहे. मृतकाच्या पश्चात आई, वडील व बहीण असा आप्त परिवार आहेत. पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.

हे देखील वाचा:

आज तालुक्यात कोरोनाचे 3 रुग्ण

सुभाषचंद्र बोस चौकातील देशी दारुच्या दुकानावर धाड

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.