दामले फैल येथे कोरोनाचा शिरकाव

ऍक्टिव्ह रुग्णांमध्ये सातत्याने वाढ

0

जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात कोरोनाचे 2 रुग्ण आढळून आलेत. कालपेक्षा ही संख्या दोनने कमी आहे. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरातील 2 रुग्ण आहे. शहरातील दामले फैल व टागोर चौक येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. सध्या तालुक्यात कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण 41 आहेत.

रविवारी दिनांक 14 मार्च रोजी 106 संशयीतांची रॅपिट ऍन्टिजन टेस्ट घेण्यात आली. यातील 2 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत तर 104 व्यक्ती निगेटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 90 व्यक्तींचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. अद्याप यवतमाळहून 427 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. दरम्यान आज 1 कोरोनामुक्त रुग्णांला सुटी देण्यात आली.

सध्या तालुक्यात 41 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 8 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 22 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 11 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. आतापर्यंत तालुक्यात कोरोनाचे एकूण 1298 रुग्ण आढळून आलेत. यातील 1232 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 25 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हे देखील वाचा:

गांधी चौक येथील व्यापारी संजय बाबूलाल मुथा यांचे निधन

नुकतेच MBBS डॉक्टर झालेल्या तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

Leave A Reply

Your email address will not be published.