दारु दुकाने ‘लॉक’, तळीरामांना ‘शॉक’

स्टॉक नसल्याने अनेकांची झाली पंचाईत

0

जितेंद्र कोठारी, वणी: राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात सोमवार 5 एप्रिल पासून नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने 30 एप्रिल पर्यंत बंद करण्यात आली आहे. बंद असलेल्या दुकानांमध्ये दारु दुकानांचाही समावेश आहे. राज्य शासनाने देशी दारु दुकाने व बारसह वाईनशॉपही ‘लॉक’ केल्यामुळे शहरातील तळीरामांना ‘शॉक’ बसला आहे.

दारु ही राज्य शासनाच्या महसूल उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. त्यामुळे लॉकडाउन लागला तरी दारू दुकाने सुरु राहणार, असा विश्वास शौकिनाना होता. मात्र 5 एप्रिलच्या आदेशात सर्व दारु दुकाने बंदच्या आदेशामुळे तळीरामांची चांगलीच पंचाईत झाली आहे. राज्यात लॉकडाउनची चर्चा सुरु असताना काही हुशार शौकिनानं पुढील एक दोन हप्त्यांत स्टॉक घेऊन ठेवला आहे. पण ज्यांच्याकडे स्टॉक नाही ते आपल्या मित्रांकडे ‘काही एक्सट्रा आहे का’ ? अशी विचारणा करीत आहे. काही जणं आपल्या नेहमीच्या दुकानदाराला फोन करुन ‘काही तरी जमवा’ अशी विनंती करीत आहे.

जे लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, त्यांनी स्वतः व मित्रांसाठी स्टॉक भरून ठेवला. मात्र ज्यांचे हातावर पोट आहे, अशांना स्टॉक भरून ठेवणे शक्य नसल्याने एखादी क्वाटर मिळेल का, यासाठी शोधाशोध केली जात आहे. मात्र कुठेही स्टॉक मिळत नसल्याने अनेकांचे हाल सुरू आहेत.

वणी बहुगुणी हे देखील वाचा:

‘ब्रेक द चेन’ – वणीत शटर बंद, धंदा सुरु

आज तालुक्यात कोरोनाचे 13 रुग्ण

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.