वणी ते कोलारपिंपरी रस्ता ठरतोय जीवघेणा
एखाद्याचा जीव गेल्यावर रस्ता दुरुस्त होणार का? नागरिकांचा संतप्त सवाल
जब्बार चीनी, वणी : बामणी फाटा ते कोलारपिंपरी या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली. हा रस्ता नागरीकांसाठी जीवघेणा ठरत आहे.मात्र याकडे शासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने एखादा मोठा अपघात झाल्यानंतर शासन व लोकप्रतिनिधींना जाग येणार काय ? असा प्रश्न नागरीकांना पडला आहे .
वामणी फाटा ते कोलारपिंपरी हा खूप जुना रस्ता आहे.या मार्गावर सात ते आठ जिनींग प्रेसींग, कोलवॉशरी व तीन कोळशाच्या खाणी आहेत. दररोज या मार्गावर 100 च्या वर कोळशाचे मोठे ट्रक चालतात. कोळशा खदानी व जिनींग प्रेसमध्ये काम करणारा कामगार वर्ग, शेतकरी, व्यापारी असे शेकडो लोक या मार्गाने ये-जा करतात.
हा मार्ग महत्वाचा मार्ग असून या मागाने प्रवाशांची नेहमीच मोठी वर्दळ असते. या मार्गाने मोठ्या प्रमाणात जड वाहतूक होत असल्याने हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना या मार्गावरून प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तर या मार्गावर अनेक लहान मोठे अपघातदेखील नेहमीच होत असतात.
वणी कोलार पिपरी, निळापूर रोडवर निळापूर , ब्राम्हणी , कोलेरा इत्यादी गावे लागतात. तालुक्यात हा रस्ता सदेव वर्दळीचा असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहन चालतात. या गावातील वाहन चालविणाऱ्या नागरिकांना हा रस्ता मोठा धोकादायक ठरत आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने दुचाकीवाल्यांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे.
रात्री या रस्त्यावर येणारी नवीन वाहने काही ठिकाणी रस्ता चांगला असल्याने वाहन जोरात नेतात. परंतु त्यांना माहीत नसते की पुढे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. तेव्हा त्यांचा अनेक वेळा अपघात झालेला आहे . या रस्त्यावर खड्डे तर आहेतच, परंतु त्या खड्यामध्ये बारीक गिट्टी जमा झाली. गावातील नागरिकही आता रस्ता दुरुस्तीसाठी आक्रमक झाले आहेत. त्वरीत रस्ता दुरुस्त करावा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा नागरीकांनी प्रशासनाला दिला आहे.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा