नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर “ब्रेक द चेन” अंतर्गत संचारबंदीत सर्व देशी विदेशी दारूचे दुकान बंद असल्याने गावखेड्यात मोह दारूच्या हातभट्ट्यावाल्यांनी दरम्यान डोके वर काढले. मारेगाव पोलिसांनी सलग बोदाड,हिवरी येथे हातभट्टीवर तर मारेगाव येथे अवैध देशी दारू विक्रेत्यांवर धाड टाकून कारवाईचा सपाटा करत या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
यात पहिल्या कारवाईत तालुक्यातील मार्डी पासून नजीक असलेल्या बोदाड येथील पारधी बेड्यावर गेल्या अनेक दिवसांपासून हातभट्टीची मोह दारू अवैधरीत्या विक्री करत असल्याची कणकण मारेगाव पोलिसांना होती.
दरम्यान18 मार्च रोजी गुप्त माहितीच्या आधारे हात हातभट्टीवर धाड टाकून जवळपास दोनशे लिटर मोहाचा सडवा नष्ट केला. या कारवाईत पन्नास लिटर मोहाच्या दारू सह जवळपास 1,98,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.यातील आरोपी जगन पवार (40),मनोज काळे (45),विनोद पवार (37) अन्य दोन असे एकूण पाच आरोपी पोलिसांचा सुगावा लागताच घटनास्थळा वरून पसार झाले.
तसेच दुसऱ्या कारवाईत तालुक्यातील हिवरी येथे सुद्धा पेट्रोलिंग दरम्यान बिना पासिंगची होंडा शाईन मोटर सायकलवर हातभट्टीची मोह दारू 2 लिटरच्या 15 बाटल्या एकूण 30 लिटर दारूसह मोटार सायकल अंदाजे किंमत 94,000/- असा एकूण 97,000/-रुपयांचा मुद्देमाल आरोपी सूर्यभान वसंता काळे (37), मुक्ताबाई सूर्यभान काळे (35) रा.हिवरी यांचे कडून हस्तगत केला.
तर तिसऱ्या कारवाई मारेगाव शहरातील प्रभाग क्र.7 मध्ये देशी दारूची अवैध रित्या विक्री करत असताना रंगेहात पकडले.यात 180 मिली.चे 16 मग पववे अंदाजे किंमत 1600/- मोटर सायकल हिरो पॅशन किंमत 20 हजार असा एकूण 21,600/- रुपयांचा मुद्देमाल आरोपी चंदाबाई बंडू सातपुते (50),पल्लवी सातपुते (30),उमेश चाफले (35) रा.मारेगाव यांचे कडून हस्तगत केला.यात आरोपी उमेश चाफले हा घटनास्थळा पासून पसार झाला.
वरील तिन्ही प्रकरणी आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्या अंतर्गत,व कोविड 19 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार,पो.नि.जगदीश मंडलवार यांचे मार्गदर्शनात स.पो.नि.अमोल चौधरी, व जामदार सुरेंद्र टोंगे, भालचंद्र मांडवकर, आनंद अचलेवार, अजय वाभिटकर,विणेश राठोड,रजनिकांत पाटील,राजू टेकाम,वैशाली गाडेकर,पायल दुधकोहळे व होमगार्ड यांनी केली.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा