सुशील ओझा,झरी: संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाच्या संसर्गामुळे तसेच रुग्ण संख्येत प्रचंड वाढ झाल्यामुळे शासन प्रशासन हतबल झाले आहे. कोरोना संसर्ग रोखण्याकरिता सरकारने विविध उपाययोजना केल्या मात्र अजूनपर्यंत पाहिजे तसा रिजल्ट मिळाला नसल्याने सरकार लॉकडाऊन करण्याच्या मनस्थितीत दिसत आहे. सरकारने कोरोनापासून बचाव करण्याकरिता जनतेला विविध नियम व बंधने पाळण्यास सांगितले आहे.
परंतु अनेक ठिकाणी या नियमाना पायदळी तुडवत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. जिल्हा पातळी पासून तर तालुका पातळीपर्यंत शासन सज्ज असून सुद्धा कोरोनाचा संसर्ग रोखण्यात अपयशी ठरत आहे. कारण जनता सोशल डिस्टनसिंग नाही, तोंडावर मास्क नाही,सैनिटायजरचा वापर नाही त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ होत आहे.
जिल्ह्यासह झरी तालुक्याला सुद्धा कोरोना संसर्गाने ग्रासले असून रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. तालुक्यात 134 रुग्ण अॅक्टीव्ह असून 4 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद शासन दप्तरी आहे . तालुक्यातील अनेक लोकांनी यवतमाळ, नागपूर,वणी,चंद्रपूर व इतर शहरातील खाजगी रुग्णालयात तपासणी केली. तपासणीत खूप जण कोरोना पॉजिटीव्ह आलेत.
अनेकांनी खाजगी रुग्णालयात उपचार केले. अशा रुग्णांची नोंद नसल्याने तालुक्यातील रुग्णांचा व मृत्यूचा आकडा कमी झाला आहे. तालुक्यातील रुग्णांचा व मृत्यूचा तालुक्यातील आकडयाच्या नोंदीपेक्षा जास्त असाव्यात. तालुक्यात एकूण 167 पॉजीटीव्ह रुग्ण होते. त्यापैकी 33 रुग्ण बरे होऊन घरी परत गेले आहे
तर आयसोलेशन वॉर्ड मध्ये 52 रुग्ण आहे व होम क्वारेंनटाईन 82 रुग्ण आहे. होम क्वारेंनटाईन मधील 8 रुग्ण बाहेर फिरत असल्यामुळे त्यांना उचलून आयसोलेशन वॉर्डात आणणार असल्याची माहिती देण्यात आली. ज्यामुळे एकूण 74 रुग्ण होम क्वारेंनटाईन राहणार आहे.
तालुक्यातील अडकली 1, बिरसाईपेठ 4, चालबर्डी 3, चीचघाट 7, देमाडदेवी 1, धानोरा 2, दिग्रस 3, डोंगरगाव 1, दुर्भा 1,दुर्गापूर 1,गणेशपूर( खडकी) 14, घोंसा 1, हिरापूर 1, हिवरा बारसा 31, जामनी 2, खडकडोह 1,लिंगती 4, मांडवा 3,मांडवी 2,मार्किं 1, मुकुटबन 21,आरसीसीपीएएल कंपनी 2,पांढरकवडा (ल) 4, पाटण – बोरी 14, सालेभट्टी 1, शिबला 1,येडसी 1, व झरी 8 असे कोरोना रुग्ण संख्या असुन सर्वांचे उपचार सुरू आहे.
विशेष म्हणजे रुग्णांच्या उपचारकरिता 12 स्टाफ नर्सच्या जागा रिक्त असल्याने मोठी अडचण आरोग्य विभाला येत आहे. तरी ही रिक्त पदे त्वरित भरल्यास आरोग्य विभागाची मोठी अडचण दूर होणार व त्वरित भरावी अशी मागणी होत आहे.
तालुक्यातील कोरोनाच्या रुग्ण तपासणी पासून तर आयसोलेटपर्यंत मोठी कामगिरी तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन गेडाम, तहसीलदार गिरीश जोशी, पाटणच्या ठाणेदार संगीता हेलोंडे, मुकुटबन ठाणेदार धर्मा सोनुने व त्यांचा कर्मचारी वर्ग मोठ्या तत्परतेने काम करीत आहे.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा