नवरदेवासह जावई व इतर चार जणांविरोधात गुन्हे दाखल.
अडेगाव येथे रिसेप्शनला 400 लोकांची गर्दी
सुशील ओझा, झरी: महाराष्ट्र सरकारने लग्नातील गर्दी टाळण्याकरिता तसेच कोरोनाचा संसर्ग पसरू नये याकरिता 25 लोकांच्या उपस्थितीत तसेच दोन तासात लग्न आटपविण्याचे सक्तीचे आदेश पारित केले आहे. सदर आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर 50 हजाराचा दंड ठोठावण्याचा आदेश आहे.
मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अडेगाव येथील एका समारंभात असाच प्रकार पहायला मिळाला. अडेगाव येथे 23 एप्रिल रोज मंगेश चिंचोळकर यांच्या घरी रात्री रिसेप्शनचा कार्यक्रम होता. ग्रामपंचायतची कोणतीही परवानगी न घेता तसेच कार्यक्रमाला चक्क तीनशे ते चारशे लोकांची गर्दी केली.
सरपंच यांनी फोन करून याबाबतची माहिती मुकुटबंन पोलिसांना दिली. यावरून पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड, मोहन कुडमेथे, खुशाल सुरपाम, जितेश पानघाटे व इतर कर्मचारी पोलिस वाहन घेऊन घटनास्थळी दाखल झाले. पोलीस कर्मचारी यांना सदर कार्यक्रमात कोरोना शासकीय नियमाचे उल्लंघन केल्याचे दिसून आले.
पोलिसांनी स्थानिक ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस पाटील यांना बोलावून विचारणा केली असता लग्नासाठी कुठलीही परवानगी घेतली नसल्याचे पोलिसांना सांगितले. ग्रामपंचायत अंतर्गत 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्याकरिता ग्रामपंचायतचा कर्मचारी आला असता त्याच्या सोबत हुज्जत घालूम आम्ही दंड भरत नाही तुम्हाला जे होते ते करा असे उद्धट बोलले.
शासनाच्या नियमांचे पालन केले नसल्याने तसेच अशा कृत्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढविण्याचा प्रयन्त केला व शासनाच्या नियमांचे पायमल्ली केली.
यावरून मंगेश श्रीराम चिचुलकर वय (26), शंकर दादाजी झाडे जावई (38) वैभव लक्ष्मण चिंचुलकर(22), श्रीराम चिंचुलकर (56), विशाल चिंचोलकर(18), यांच्यावर संचारबंदी कलम 188, 269, 270, 37(1) साथरोग अधिनियम 1897(2)(3)(4) अंतर्गत गुन्हे पोलीसानी दाखल केले. पुढील तपास ठाणेदार धर्मा सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड, पोलीस शिपाई जितेश पानघाटे करीत आहे.
हेदेखील वाचा